मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sunil Holkar Death : तारक मेहतातील मराठमोळ्या अभिनेत्याचं निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

Sunil Holkar Death : तारक मेहतातील मराठमोळ्या अभिनेत्याचं निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 13, 2023 10:11 PM IST

Sunil Holkar Death : सुनिल होळकर यांना लिव्हर सोरायसिस हा आजार झाल्यामुळं त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.

Actor Sunil Holkar Passes Away
Actor Sunil Holkar Passes Away (HT)

Actor Sunil Holkar Passes Away : हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील मराठमोळे अभिनेते सुनिल होळकर यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं आहे. त्यामुळं संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनामुळं अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये गेली अनेक वर्ष अभिनयामुळं सुनिल होळकर यांनी चाहत्यांवर एक वेगळीच छाप सोडली होती. त्यामुळं आता त्यांच्या अचानक निधनामुळं अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.

अभिनेते सुनिल होळकर यांना लिव्हर सोरायसिस हा आजार झालेला होता. त्यामुळं त्यांच्यावर गेली अनेक दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. लिव्हर सोरायसिसमुळं कोणत्याही क्षणी शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं डॉक्टरांची स्पेशल टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होती. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असतानाच अचानक कालपासून त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर आज दुपारी त्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

सुनिल होळकर यांनी मोरया या चित्रपटात जबरदस्त अभिनय केलेला आहे. याशिवाय तारक मेहता का उल्टा चश्मा या हिंदी मालिकेतही त्यांनी आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. इतकंच नाही तर गोष्ट पैठणीची या चित्रपटातही त्यांनी काम केलेलं होतं. मॅडम सर, मिस्टर योगी या मालिकेतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. सुनिल यांनी अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत गेली अनेक वर्षे काम केलेलं आहे. त्यामुळं आता त्यांच्या निधनामुळं अनेकांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

WhatsApp channel