Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Shialesh Lodha: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम शैलेश लोढा यांच्यावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शैलेश यांचे वडील श्यामसिंह लोढा यांचे निधन झाले आहे. शैलेशचे वडील अनेक दिवसांपासून आजारी होते. या बातमीमुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. या दु:खाच्या काळात सर्वजण शैलेशला धीर देत आहेत. पण वडिलांना गमावल्याचं दु:ख शैलेशला सहन होत नाही. वडिलांच्या निधनानंतर त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
शैलेश लोढा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडील श्यामसिंह लोढा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून मोहक हास्य करताना दिसत आहे. शैलेशसाठी हा फोटो किती मौल्यवान आहे हे स्पष्ट होत आहे. शैलेशने या फोटोसोबत अतिशय भावनिक कॅप्शन लिहिले आहे. त्याने लिहिलं की, ‘मी काहीही असो, मी तुझी सावली आहे, आज सकाळच्या सूर्याने जग उजळून टाकलं. पण आमचं आयुष्य अंधारमय झालं, बाबांनी देहत्याग केला आहे, अश्रूंना जर भाषा असती तर मी काहीतरी लिहू शकलो असतो, पुन्हा एकदा सांगू शकलो असतो माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, तुमचा बबलू. ’
शैलेश लोढा यांनी वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच त्यांचे सहकलाकार आणि चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. प्रत्येकजण त्यांना दिलासा देत आहे. शैलेशच्या पोस्टवर कमेंट करत तारक मेहता शोची अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने लिहिले- ‘ओम शांती... स्वत:ची काळजी घ्या.’ याशिवाय सुनील पाल यांनीही श्रद्धांजली वाहिली. या बातमीमुळे चाहत्यांनाही खूप दु:ख झाले आहे. शैलेश लोढा यांच्या पोस्टवर एका युजरने लिहिले की, ‘विनम्र श्रद्धांजली. ओम शांती.’ आणखी एका युजरने लिहिले, ‘खूप दुःख झाले, देव तुमच्या वडिलांना त्यांच्या चरणी स्थान देवो.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘बाप हा बाप असतो’.
शैलेश लोढा यांनी सब सोनीच्या लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये तारक मेहताची भूमिका साकारली होती. मात्र, आता ते या शोचा भाग नाहीत आणि त्याची जागा आता अभिनेता सचिन श्रॉफने घेतली आहे. शैलेशने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसोबत एक वाईट बातमी शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी वडिलांचे निधन झाल्याचे सांगितल्यावर आता चाहत्यांनी पोस्टवर कमेंट करून त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.