TMKOC Abdul: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दुकान चालवणाऱ्या अब्दुलकडे आहेत स्वतःचे दोन आलिशान हॉटेल्स!-taarak mehta ka ooltah chashmah abdul aka actor sharad sankla is the owner of 2 restaurants in real life ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC Abdul: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दुकान चालवणाऱ्या अब्दुलकडे आहेत स्वतःचे दोन आलिशान हॉटेल्स!

TMKOC Abdul: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दुकान चालवणाऱ्या अब्दुलकडे आहेत स्वतःचे दोन आलिशान हॉटेल्स!

Aug 22, 2024 08:41 AM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Abdul: या मालिकेत अब्दुल सोसायटीच्या गेटवर एक छोटं ‘ऑल इन वन’ नावाचं दुकान चालवतो, ज्यात वाणसामानापासून कोल्डड्रिंक्सपर्यंत सगळ्या गोष्टी विकत मिळतात.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Abdul: अब्दुलकडे आहेत स्वतःचे दोन आलिशान हॉटेल्स!
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Abdul: अब्दुलकडे आहेत स्वतःचे दोन आलिशान हॉटेल्स!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Abdul:प्रसिद्ध कॉमेडी टीव्ही शो'तारक मेहता का उल्टा चष्मा'अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक पात्र लोकांना खूप आवडते. या शोमध्ये अशी अनेक पात्रे आहेत, जी शोच्या सुरुवातीपासूनच आहेत आणि त्यातील एक पात्र म्हणजे अब्दुल. मालिकेतील हे पात्र अभिनेते शरद सांकला साकारत आहेत.अब्दुलची भूमिका साकारणाऱ्या शरद सांकला यांना इंडस्ट्रीत काम करता करता आता २७ वर्षे झाली आहेत. शरद यांनी आपल्या कारकिर्दीत ३५हून अधिक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. सध्या या मालिकेत असा ट्रॅक सुरू आहे की, अब्दुल एक मोठं कर्ज घेऊन आता दुकान सोडून गायब झाला आहे. तर, दुसरीकडे गोकुळधाम सोसायटीमधील सगळी मंडळी त्याचा शोध घेत आहेत.

या मालिकेत अब्दुल सोसायटीच्या गेटवर एक छोटं ‘ऑल इन वन’ नावाचं दुकान चालवतो, ज्यात वाणसामानापासून कोल्डड्रिंक्सपर्यंत सगळ्या गोष्टी विकत मिळतात. तो एक मध्यमवर्गीय कुटुंबातील, चाळीत राहणारा माणूस आहे. मात्र, प्रत्यक्ष आयुष्यात ‘अब्दुल’ दोन आलिशान हॉटेल्सचा मालक आहे.

TMKOC: बॉलिवूडच्या ‘या’ ५ अभिनेत्यांनी नाकारलं होतं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तील ‘जेठालाल’ पात्र!

प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला खूप संघर्ष!

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या अब्दुलला आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. शरद यांची पहिली कमाई अवघी ५० रुपये होती.पण, आता एवढ्या मोठ्या अभिनय कारकिर्दीनंतर ते स्वतःच्या मेहनतीच्या बळावर २ रेस्टॉरंटचे मालक बनले आहेत. शरद यानी पहिल्यांदा १९९०मध्ये'वंश'चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. या चित्रपटात त्याने चार्ली चॅप्लिनची भूमिका साकारली होती. चित्रपटातील ही भूमिका खूपच छोटी होती, ज्यासाठी शरद यांना फक्त ५० रुपये मिळायचे. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांतून लोकांचे मनोरंजन केले.'खिलाडी', 'बाजीगर', 'बादशाह'यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. मात्र, असे असतानाही ते आठ वर्षे बेरोजगार होते. यानंतर त्यांच्याकडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेची संधी चालून आली, ज्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

स्वतःचे दोन आलिशान रेस्टॉरंट!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शरद सांकला हे मुंबईतील दोन रेस्टॉरंटचे मालक आहेत. त्याचे एक रेस्टॉरंट ‘पार्ले पॉइंट’ जुहू येथे आहे. तर, दुसरे ‘चार्ली कबाब’ हे अंधेरी येथे आहे. एका मुलाखतीदरम्यान शरद म्हणाले होते की, 'शो किती काळ सुरू राहील हे आम्हाला माहीत नाही,त्यामुळे भविष्यातील गुंतवणूक आणि मुलांच्या उज्वल भविष्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागेल.'याच कारणामुळे शरदने मुंबईत दोन रेस्टॉरंट उघडले आहेत.