Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Sonu: छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गेल्या काही वर्षांपासून हा शो अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. मात्र, गेल्या काही काळात अनेक कलाकारांनी एकापाठोपाठ एक हा शो सोडला आहे. दरम्यान असित मोदी आणि त्यांच्या शोमधील काही कलाकारांमधील वादही चर्चेत आले होते. आता नुकतीच अशी बातमी आली आहे की, 'तारक मेहता...' या मालिकेत ‘सोनू भिडे’ची भूमिका साकारणारी पलक सिधवानीने प्रॉडक्शन हाऊससोबतचा करार मोडला आहे. यामुळे आता असित मोदी यांची टीम पलकवर कायदेशीर कारवाई करू शकते, असेही सांगण्यात आले होते. आता खुद्द पलक सिधवानीने या बातम्यांवर मौन सोडले आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' पलक सिधवानीने नुकतीच टेलि टॉक/टाइम्स नाऊला मुलाखत दिली. या मुलाखतीत पलकने कॉन्ट्रॅक्ट तोडून कायदेशीर कारवाई करण्याच्या वृत्तावर नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर फिरत असलेल्या अशा सर्व बातम्या पूर्णपणे निराधार आणि बकवास असल्याचे तिने म्हटले आहे. 'माझी बाजू जाणून न घेता लोक कुणासाठी अशा गोष्टी कशा लिहू शकतात माहित नाही? याला इतर कलाकारही पाठिंबा देतात. माझ्यात आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये असं काहीही घडलेलं नाही', असं म्हणत पलकने कायदेशीर कारवाईची गोष्ट पूर्णपणे बकवास असल्याचे ही म्हटले आहे.
अभिनेत्री पलक सिधवानी हिने तिच्या मालिकेच्या करारातील महत्त्वाच्या अटींचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले जात आहे. आता यामुळे तिचे पात्र, शो, कंपनी आणि ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, यासंबंधी कायदेशीर नोटीस पलक सिधवानी तिच्या करारानुसार तृतीय पक्षाच्या समर्थनाशिवाय आणि उपस्थितीशिवाय जाण्याशी संबंधित असू शकते. सोनूची भूमिका साकारणारी पलक सिधवानी चार वर्षांपूर्वी या शोमध्ये सहभागी झाली होती.
पलक सिधवानीच्या आधी निधी भानुशालीने ‘सोनू भिडे’ची भूमिका साकारली होती. दोन्ही कलाकारांची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. पलकने देखील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि मालिकेच्या प्रेक्षकांशी घट्ट नातेही निर्माण केले आहे. दिलीप जोशी, मंदार चांदवडकर, मुनमुन दत्ता, सुनैना फौजदार, सोनालिका जोशी हे कलाकार सध्या या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत.