'तारक मेहता का उल्टा चश्मा' या टीव्ही मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी आणि बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता यांची फॅन फॉलोइंग मोठी आहे. नुकतीच मुनमुन दत्ता आपल्या आईसोबत शॉपिंग करून परतत असताना पॅपराझींनी तिला वाटेतच अडवले आणि अभिनेत्रीने पॅप्सना कोणतीही तक्रार न करता फोटो काढण्याची संधी दिली. जेव्हा मुनमुन तिच्या आईसोबत पोज देत होती, तेव्हा तिला फोटोग्राफर्सने जेठालाल विषयी प्रश्न विचारला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका फोटोग्राफरने मुनमुनला सांगितले की, "तुम्ही जेठालालला तुमच्या वाढदिवसासाठी बोलवायला हवे होते." ते ऐकून मूनमून दत्ताचा मूड पूर्ण बदलतो. तिने निराश होऊन फोटोग्राफरला उत्तर दिले की, 'अरे भाई.' नंतर मूनमूनने हसत म्हटले की, 'कधी तरी प्रश्न विचारायचे थांबवा.' मूनमूनसोबत उभी असणारी तिच्या आईचा देखील मूड खराब होतो. तेव्हा मूनमून म्हणाली की, 'कार्यक्रम वेगळा आहे, खऱ्या आयुष्यात वेगळ्या गोष्टी सुरु असतात.' त्यानंतर मूनमून आईला घेऊन फोटोग्राफर्ससोबत फोटो काढते आणि नंतर गाडीत येऊन बसते.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत मुनमुन दत्ता ही जेठालालची शेजारी राहत असते. ती बबिता हे पात्र साकारताना दिसत आहे. जेठालालला बबिताला आठडत असते. पण तो तिला कधीच मोकळेपणाने सांगू शकत नाही. कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने लिहिले की, बबिता जेठालाल कुठे आहे? दुसऱ्या एका यूजरने, 'हा व्हिडिओ पाहून जेठालाल नक्कीच खूश झाला असेल' अशई कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'जेठालाल विचार करत असावा की माझ्या प्रेमाला शेवट झाला' असे म्हटले आहे. तर चौथ्या एका यूजरने बबिताला चांगलेच सुनावले आहे, 'याच कार्यक्रमामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचले आहात.'
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून गेल्या काही दिवसांत कलाकार बाहेर पडले आहेत. हाथी भाईपासून टपूपर्यंत आणि अगदी तारक मेहतापर्यंत कलाकारांनी मालिकेला निरोप दिला. आता मालिकेच्या सुरुवातीला जे कलाकार होते ते मालिकेत दिसत नाही. त्यातील मोजकेच कलाकार दिसत आहेत. दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानीदेखील बऱ्याच दिवसांपासून मालिकेपासून लांब आहे. चाहते तिला पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.