'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्हीवरील लोकप्रिय शोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या शोमध्ये पहिल्यांदाच सोनू भिडेची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री झील मेहता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
(instagram)झील तिचा लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड आदित्य दुबेसोबत विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री आदित्यसोबत तिचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. दरम्यान आता फोटो शेअर करत आपल्या लग्नाला किती दिवस उरले आहेत ते सांगितले आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील जुनी सोनू म्हणजेच झील मेहताने तिच्या इन्स्टाग्रामवर भावी पतीसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आमच्या लग्नाला अजून १०० दिवस बाकी आहेत.
झील मेहताने आदित्य दुबेसोबतचे खूप सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.
काही महिन्यांपूर्वी झील मेहताने आपला जुना मित्र आणि नंतर बॉयफ्रेंड असणाऱ्या आदित्य दुबईसोबत साखरपुडा उरकत सर्वांना गोड बातमी दिली होती.
काही दिवसांपूर्वी झीलने तिच्या मित्रांसोबत गोव्यात बॅचलर पार्टी केली होती. तिने पार्टीचे फोटोही पोस्ट केले होते. ज्यामध्ये ती फ्लोरल ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत होती.