बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते राज ग्रोवर यांचे निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. अमेरिकेतली न्यू जर्सीमधील ओल्ड ब्रिज येथे त्यांचे ४ जून रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राज ग्रोवर हे काही वर्षांपूर्वीच अमेरिकेत स्थायिक झाले. ते इंडस्ट्रीमधील मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी केवळ भारतात येत असत. कायम हसतमुख आणि आनंदी असणाऱ्या लोकांमध्ये राज ग्रोवर यांचे नाव घेतले जाते. त्यांचा एक डायलॉग कायम असायचा 'ग्रोवर नेवर ओवर.' राज ग्रोवर यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे.
वाचा: "दोन मनाच्या दोन दिशा अन एक हळवी वाट...", ‘अंतरपाट’ मालिकेचे शीर्षकगीत ऐकलेत का?
राज ग्रोवर यांनी आजवर अनेक चित्रपटांची निर्माती केली. यामधील 'ताकद' या चित्रपटाची विशेष चर्चा रंगली. या चित्रपटात विनोद खन्ना, परवीन बाबी आणि राखी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटानंतर त्यांनी त्रिलोक मलिक यांच्यासोबत 'आर्या' चित्रपटाची निर्मिती केली. तसेच 'ठिकाणा' हा त्यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अनिल कपूर, अमृता सिंह आणि स्मिता पाटील या कलाकारांनी काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते.
वाचा: 'दुनियादारी २' येणार? अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरच्या नव्या चित्रपटाची घोषणा
चित्रपटांची निर्मिती करण्यासोबतच राज ग्रोवर यांना लेखनामध्ये रुची होती. काही दिवसांपूर्वी राज ग्रोवर यांचे 'द लेजेंड्स ऑफ बॉलिवूड' हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्यांच्या या पुस्तकाला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. राज ग्रोवर यांचे निधन कोणत्याही आजाराने झाले नसल्याची माहिती समोर आले आहे. त्यांची प्रकृती एकदम चांगली होती. मंगळवारी अचानक त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना देखील धक्का बसला.
वाचा: नैनाचे सत्य कला आणणार का सर्वांसमोर? 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?
संबंधित बातम्या