मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तापसी पन्नू लग्न बंधनात अडकली? सिक्रेट वेडिंग फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

तापसी पन्नू लग्न बंधनात अडकली? सिक्रेट वेडिंग फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 26, 2024 09:43 AM IST

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने गुपचूप लग्न उरकल्याचे समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने नुकतेच तिचा प्रियकर मॅथियास बोईसोबत उदयपूरमध्ये लग्न केले आहे.

तापसी पन्नू लग्न बंधनात अडकली? सिक्रेट वेडिंग फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण!
तापसी पन्नू लग्न बंधनात अडकली? सिक्रेट वेडिंग फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने गुपचूप लग्न उरकल्याचे समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने नुकतेच तिचा प्रियकर मॅथियास बोईसोबत उदयपूरमध्ये लग्न केले आहे. त्यांचा हा विवाह सोहळा शनिवारी २३ मार्च रोजी पार पडला आहे. या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त जवळच्या मित्रांनाही आमंत्रित करण्यात आले होते, ज्यात अनुराग कश्यप आणि पावेल गुलाटी यांचा समावेश होता. मीडिया रिपोर्टनुसार, हे लग्न उदयपूरमध्ये पार पडले आहे. या लग्न सोहळ्यात सगळ्याच गोष्टी खूप खाजगी ठेवण्यात आल्या होत्या. २० मार्चपासून सुरू झालेल्या या लग्न सोहळ्यात प्री-वेडिंग समारंभही पार पडला. या जोडीला त्यांच्या लग्नाच्या दिवशी कोणतेही मोठे मीडिया कव्हरेज किंवा झगमगाट नको होता, म्हणून त्यांनी हा दिवस अतिशय खाजगी आणि खास लोकांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

तापसी पन्नूच्या या लग्न सोहळ्यात बॉलिवूडचे सेलिब्रिटी सामील झाले नव्हते. मात्र, काही मोजक्या लोकांना आमंत्रण देण्यात आल्याचे समोर आले आहे. तापसीने तिच्या लग्नात दिग्दर्शक आणि जवळचा मित्र अनुराग कश्यपला आमंत्रित केले होते. याशिवाय 'थप्पड'मधला तिचा को-स्टार पावेल गुलाटीही या पाहुण्यांच्या यादीमध्ये सामील होता. अनुराग कश्यप आणि तापसी खूप जवळचे मित्र आहेत. या दोघांनी 'मनमर्जियां', 'दोबारा' आणि 'सांड की आँख' सारखे चित्रपट एकत्र केले आहेत. या लग्नात कनिका ढिल्लन आणि तिचा पती हिमांशू शर्मा देखील उपस्थित होते.

घटस्फोट दूरच... एकमेकांच्या रंगात रंगले ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन! फोटो पाहून चाहते सुखावले

पावेल गुलाटीच्या फोटोंनी चर्चांना उधाण

अभिनेता पावेल गुलाटी याने सोशल मीडियावर लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता अभिलाष थपियाल देखील दिसत आहेत. असे म्हटले जात आहे की, लग्नानंतर तापसी लवकरच तिच्या इंडस्ट्रीतील मित्रांसाठी मुंबईत पार्टी देणार आहे. लग्नाच्या रिसेप्शन पार्टीची तारीख ती लवकरच जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे. तापसीच्या लग्नाची झलक शेअर करताना पावेल गुलाटीने सोशल मीडियावर लिहिले, ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, आम्हाला माहित नाही...आम्ही कुठे आहोत.. ओळख पाहू!’

उदयपूरमध्ये पार पडला लग्न सोहळा

तापसी आणि मॅथियासने उदयपूरमध्ये शीख आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केल्याचे म्हटले जात आहे. कनिका ढिल्लनने तापसी पन्नूसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने पती हिमांशू शर्मासोबत लग्नाला हजेरी लावली होती. एक दिवसापूर्वी कनिकाने इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती सुंदर ड्रेसमध्ये दिसली होती. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'माझ्या मैत्रिणीचे लग्न होत आहे'. तिचे हे फोटो उदयपूरचेच असल्याचे समजते आहे. तापसी आणि कनिकाने 'हसीन दिलरुबा', 'मनमर्जियां', 'डंकी' आणि 'फिर आयी हसीन दिलरुबा'मध्ये एकत्र काम केले आहे.

शिव ठाकरेही झालाय कास्टिंग काउचचा शिकार; आपबिती सांगताना म्हणाला 'कपड्यांचे माप घेण्याच्या बहाण्याने...'

१० वर्षांच्या डेटिंगनंतर बांधली लग्नगाठ

तापसी पन्नू आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बोई गेल्या १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तापसी पन्नू आणि मथियास बोई यांची पहिली भेट २०१३ मध्ये इंडियन बॅडमिंटन लीगच्या उद्घाटन समारंभात झाली होती. काही आठवड्यांपूर्वीच तापसी लग्न करणार असल्याची बातमी समोर आली होती.

IPL_Entry_Point