Taapsee Pannu Marriage: बॅडमिंटनपटूसोबत लग्नगाठ बांधणार तापसी पन्नू! मोजक्याच लोकांना मिळणार आमंत्रण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Taapsee Pannu Marriage: बॅडमिंटनपटूसोबत लग्नगाठ बांधणार तापसी पन्नू! मोजक्याच लोकांना मिळणार आमंत्रण

Taapsee Pannu Marriage: बॅडमिंटनपटूसोबत लग्नगाठ बांधणार तापसी पन्नू! मोजक्याच लोकांना मिळणार आमंत्रण

Feb 28, 2024 01:01 PM IST

Taapsee Pannu Mathias Boe Wedding: अभिनेत्री तापसी पन्नू तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोई याच्यासोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

Taapsee Pannu Marriage
Taapsee Pannu Marriage

Taapsee Pannu Mathias Boe Wedding: सध्या चित्रपटसृष्टीत लग्नाचा हंगाम सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. नुकतेच अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचे लग्न झाले. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता अभिनेत्री तापसी पन्नू हिनेही आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. लवकरच त्यांचा हा खाजगी विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी बोटावर मोजून लोकांना बोलावलं जाणार आहे. या लग्न सोहळ्याचे बॉलिवूडलाही निमंत्रण नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहे तपासीचा होणारा नवरा?

अभिनेत्री तापसी पन्नू तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोई याच्यासोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या १० वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. बराच काळ एकत्र राहिल्यानंतर आणि डेटिंग केल्यानंतर आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तापसी पन्नूचा होणारा नवरा मॅथियास बोई हा डेन्मार्कचा माजी बॅडमिंटनपटू आहे. २०१५मध्ये मॅथियास बोईने युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. इतकेच नाही तर, मॅथियास बोई २०१२ आणि २०१७मध्ये युरोपियन चॅम्पियन देखील ठरला आहे. याशिवाय मॅथियासने समर ऑलिम्पिक २०१२मध्ये रौप्य पदक पटकावले होते. तापसी आणि मॅथियास यांची पहिली भेट २०१३मध्ये झाली होती. तेव्हापासून त्यांच्या नात्याला सुरुवात झाली.

Rajinikanth: एक-दोन नव्हे तब्बल २४ वर्षांनंतर रजनीकांत करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक! ‘या’ दिग्दर्शकाची मोठी घोषणा

तापसी आणि मॅथियास कधी करणार लग्न?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोई याच्यासोबत पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये लग्न करणार आहे. अभिनेत्रीने अद्याप यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नसले, तरी सध्या तापसी आणि मॅथियास यांच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहे. तापसी आणि मॅथियास यांचे लग्न अतिशय खाजगी पद्धतीने होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांचा हा लग्नसोहळा इतका खाजगी असणार आहे की, बी-टाऊनचे सेलिब्रिटीही या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत.

तापसी आणि मॅथियास यांचे लग्न दोन पद्धतींनी पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. आधी ही जोडी शीख रितीरिवाजांनुसार लग्नगाठ बांधतील आणि त्यानंतर तापसी-मॅथियास ख्रिश्चन पद्धतीने दुसऱ्यांदा लग्न करतील. या दोघांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Whats_app_banner