Tapsee Pannu: स्पाय थ्रिलर सिनेमे करणाऱ्या कलाकारांवर तापसी पन्नूचा निशाणा, वाचा काय म्हणाली
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tapsee Pannu: स्पाय थ्रिलर सिनेमे करणाऱ्या कलाकारांवर तापसी पन्नूचा निशाणा, वाचा काय म्हणाली

Tapsee Pannu: स्पाय थ्रिलर सिनेमे करणाऱ्या कलाकारांवर तापसी पन्नूचा निशाणा, वाचा काय म्हणाली

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 16, 2024 05:58 PM IST

Tapsee Pannu: तापसी पन्नू लवकरच एका अॅक्शन थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान, तापसीने स्पाय थ्रिलर चित्रपट करणाऱ्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. जाणून घेऊया काय म्हणाली तापसी पन्नू.

Tapsee Pannu
Tapsee Pannu

Tapsee Pannu: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू अशा कलाकारांपैकी एक आहे जी आपली मते स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तापसी पन्नूने स्पाय थ्रिलर चित्रपट करणाऱ्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. तापसी पन्नू लवकरच एका अॅक्शन थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे. त्यापूर्वी तिने स्पाय थ्रिलर सिनेमे करणाऱ्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. आता तापसी नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया...

स्पाई थ्रिलर चित्रपटांवर तापसी पन्नू काय म्हणाली?

तापसी पन्नूने नुकताच 'न्यूज एक्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तापसीला अॅक्शन थ्रिलर चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत तापसी म्हणाली की जेव्हा स्पाय सिनेमांचा ट्रेंड नव्हता तेव्हा तिने यामध्ये काम केले आहे. 'आजकाल सगळ्यांनाच स्पाय थ्रिलर सिनेमामध्ये काम करायचे आहे. मी असे चित्रपटात त्या काळात केलेत जेव्हा या चित्रपटांचा फार ट्रेंड नव्हता. त्यामुळे मला आता थोडो विचित्र वाटेल. तुम्हाला ज्या सिनेमात काम केलय त्याच सिनेमात पुन्हा काम का कराल ना? मी त्या काळात जे काही केले ते उल्लेखनीय होते. मला पुन्हा तिकडे वळायचे नाही. जे छान सुरु आहे ते मला खराब करायचे नाही. माझे ठरले आहे जर मला अॅक्शन थ्रिलर करावे लागले तर मी हे विश्व सोडून दुसऱ्या कोणत्या तरी विश्वात पदार्पण करेन' असे तापसी म्हणाली.

२०१५मध्ये तापसीने केली करिअरला सुरुवात

तापसी पन्नूने २०१५मध्ये अक्षय कुमारच्या बेबी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. तापसीचा कॅमियो प्रेक्षकांना इतका आवडला होता की तिच्या 'नाम शबाना' नावाच्या व्यक्तिरेखेवर एक वेगळा अॅक्शन चित्रपट तयार करण्यात आला.
वाचा: अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू, शब्दही फुटत नव्हते

तापसीच्या कामाविषयी

तापसी पन्नूच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तापसी नेटफ्लिक्सओरिजिनल 'गांधारी'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल. हा चित्रपट एका आई-मुलीची कथा आहे. एक आई आपल्या मुलीचा बदला घेताना दिसणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून यात आईचा प्रेमळ स्वभाव तसेच मुलांसाठी आई काय काय करु शकते हे दाखवण्यात आले आहे.

Whats_app_banner