Taambdi Chaamdi : मराठमोळ्या क्रेटेक्सने अखेर मराठी वाजवलंच! पहिलंवहिलं धमाकेदार ‘तांबडी चांबडी’ हे मराठी गाणं प्रदर्शित-taambdi chaamdi marathi song the music video of the song taambadi chaambadi by cretex and shreyas has out ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Taambdi Chaamdi : मराठमोळ्या क्रेटेक्सने अखेर मराठी वाजवलंच! पहिलंवहिलं धमाकेदार ‘तांबडी चांबडी’ हे मराठी गाणं प्रदर्शित

Taambdi Chaamdi : मराठमोळ्या क्रेटेक्सने अखेर मराठी वाजवलंच! पहिलंवहिलं धमाकेदार ‘तांबडी चांबडी’ हे मराठी गाणं प्रदर्शित

Aug 27, 2024 12:31 PM IST

Taambdi Chaamdi Marathi Song: सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्रेटेक्स आणि श्रेयसचा ‘तांबडी चांबडी’ या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Taambdi Chaamdi Marathi Song: मराठमोळ्या क्रेटेक्सने अखेर मराठी वाजवलंच!
Taambdi Chaamdi Marathi Song: मराठमोळ्या क्रेटेक्सने अखेर मराठी वाजवलंच!

Taambdi Chaamdi Marathi Song : ‘मराठी वाजलाचं पाहिजे’ असे बोलले जाते, तेव्हा आपसूकच एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे आपला मराठमोळा क्रेटेक्स. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्रेटेक्स आणि श्रेयसचा ‘तांबडी चांबडी’ या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. हे गाणं आता जगभरात गाजणार आहे. जगभरातील लोक हे गाणं आता बघू आणि ऐकू शकतात. स्पिनिंग रेकॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय संगीत कंपनीच्या ऑफिशल चॅनेलवर क्रेटेक्सचं ‘तांबडी चांबडी’ गाण प्रदर्शित झालं आहे. आणि त्या लेबलवरील हे पहिलंच मराठी गाणं आहे. संगीतकार क्रेटेक्स (कृणाल घोरपडे) याचे ‘तांबडी चांबडी’ या गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण होत आहे.

त्याने या गाण्याला पार्श्वसंगीत दिलं आहे, तर श्रेयस सागवेकर याने हे गाणं लिहिलं असून, त्याने आवाज दिला आहे. तेजस शेट्ये, मनीष शेट्ये, वृशाली शेट्ये, निनाद सावंत, आकाश साळुंखे, माटिन शेख, मल्हार जाधव, यश माधव, रूपेश किंगरे, अवंतिका चौघुले, आशिष नेगी, धनंजय जाधव आणि अनिकेत सोंडे या कलाकारांनी या गाण्यात अभिनय केला आहे. या गाण्याची निर्मिती वर्ल्ड ऑफ वाइब्ज आणि रॉक कच्ची यांनी केली आहे.

दिग्गजांच्या उपस्थित पार पडला सोहळा

या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा नुकताच ठाण्यातील आय लिफ बँक्वेट्स येथे पार पडला. या सोहळ्याला संगीतकार क्रेटेक्स, गायक श्रेयस, ‘तांबडी चांबडी’ गाण्याची संपूर्ण टीम तसेच हास्यजत्रा फेम पृथ्विक प्रताप, स्टँडप कॉमेडियन अनिश गोरेगांवकर, भाडिपा टीम आणि सागरिका म्युझिक चॅनल हेड सागरिका दास असे नामवंत मान्यवर उपस्थित होते.

माझी स्वप्नपूर्ती झाली : संगीतकार क्रेटेक्स

'तांबडी चांबडी' गाण्याविषयी संगीतकार क्रेटेक्स म्हणाला की, ‘माझा आनंद गगनात मावत नाही आहे. माझं स्वप्न होतं की, माझं गाणं स्पिनिंग रेकॉर्डसवर कधीतरी यावं. ज्या रेकॉर्ड लेबलवरती जगभरातील डेव्हिड ग्वेट, मार्टिन गॅरिक्स, अफ्रोजॅक, डिमिट्री व्हेग्स एंड लाइक माइक, हार्डवेल, स्टीव्हओकी अशा सुप्रसिद्ध कलाकारांची गाणी या आधी प्रदर्शित झाली आहेत. आणि आता या विविध भाषेमधील गाण्यांमध्ये आपलं मराठी गाणं प्रदर्शित होणं माझ्यासाठी ही स्वप्नपूर्ती आहे. या गाण्याच्या ऑडियोला भारतातच नव्हे, तर जगभरात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आम्ही व्हिडीओच्या स्वरूपात गाणं तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. आणि आता लवकरच मी परदेशात मराठी गाण्याचे शो करणार आहे. प्रेक्षकांच प्रेम कायम असच राहो. आणि मराठी भाषा, मराठी गाणी देशात नव्हे तर परदेशातही वाजू दे हीच सदिच्छा.’

विभाग