गेल्या काही दिवसांपासून ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील रणदीप हु़ड्डाने केले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस उलटले आहेत. आता चित्रपटाने किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अगदीच कमी कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची कमाई देखील निराशाजनक होती. आता तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही वाढ हवी तितकी नसली तरी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना दिलासा देणारी आहे.
वाचा: हंसल मेहताची क्राईम थ्रिलर स्टोरी, अमृता खानविलकरचा जबरदस्त अभिनय
पहिल्या दिवशी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २.२५ कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली. ही वाढ २.६० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विकेंडमुळे चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज देखील कमाईत वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी चित्रपट किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: शरद पोक्षेंचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहण्यास नकार, काय आहे कारण?
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर अभिनेता रणदीप हुड्डाने सावरकरांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे सावकरांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. सावरकरांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठी भाषेतील चित्रपटाला अभिनेता सुबोध भावेने आवाज दिला आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.