मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या मराठी चित्रपटाचा डंका, शंभर शोज झाले हाऊसफुल

अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या मराठी चित्रपटाचा डंका, शंभर शोज झाले हाऊसफुल

Aarti Vilas Borade HT Marathi
May 09, 2024 08:05 AM IST

'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा संगीतमय चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाने अमेरिकेत शंभर हाऊसफूल शोजचा पल्ला गाठला आहे.

अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या मराठी चित्रपटाचा डंका, शंभर शोज झाले हाऊसफुल
अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या मराठी चित्रपटाचा डंका, शंभर शोज झाले हाऊसफुल

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनप्रवास सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. केवळ प्रेक्षकच नाही तर श्रीधर फडके, आशा भोसले यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक केले. आता या चित्रपटाने परदेशातही मजल मारल्याचे चित्र दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अमेरिकेतली १०० शो सुपरहिट

समीक्षकांनीही 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाला आपली पसंती दर्शवली. चोहोबाजुंनी असा कौतुकाचा वर्षाव होत असतानाच परदेशातही 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाच्या शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेत या चित्रपटाचे जवळपास १०० शो लावण्यात आले होते. हे १००ही शो 'हाऊसफुल'च्या दिशेने वाटचाल करत असून चित्रपटाला अनेकांनी ५ स्टार्स असे रेटिंग दिले आहे. त्यामुळे हा चित्रपट जगभरात 'सुपरहिट'चे बिरुद मिरवत आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट दुबई, लंडन आणि जर्मनी या देशांमध्येही प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: गौतमी पाटीलचं नशीब चमकलं! ‘द महाराष्ट्र फाइल्स’ सिनेमातील हिंदी गाण्यावर थिरकरणार

दिग्दर्शकाने व्यक्त केला आनंद

'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे यांना मत मांडले. त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "परदेशात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तेथील काही शोज हे हाऊसफुल्ल झाले होते. चित्रपटाला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच परदेशातील प्रेक्षकही इतके प्रेम करत आहेत हे खरंच खूप भारावून टाकणारे आहे. बाबूजी हे नावच इतके मोठे आहे की त्यांची ख्याती सातासमुद्रापार आहे. त्यांची गाणी आजही अजरामर आहेत. तरुणही त्यांची गाणी तितक्याच आत्मीयतेने व आवडीने ऐकतात. चित्रपटाबद्दल अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. सगळ्याच कलाकारांचे तोंडभरुन कौतुक होत आहे. एका टीमला यापेक्षा जास्त आणखी काय हवे. मी सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो."
वाचा: बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागम, 'या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार

'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे हे दोघे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन हे योगेश देशपांडे यांनी लिहिले आहेत. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
वाचा: गौरव मोरेने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या

IPL_Entry_Point