'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील 'राणू अक्का'ला आयुष्य संपवावं वाटत होतं! नेमकं काय घडलेलं?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील 'राणू अक्का'ला आयुष्य संपवावं वाटत होतं! नेमकं काय घडलेलं?

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील 'राणू अक्का'ला आयुष्य संपवावं वाटत होतं! नेमकं काय घडलेलं?

Jan 08, 2025 03:38 PM IST

Actress Ashwini Mahangade : एक दिवस अश्विनी मनाशी आयुष्य संपण्याचा विचार करून मीरा रोडच्या शिवार गार्डनमध्ये तलावाजवळ जात होती.

Actress Ashwini Mahangade
Actress Ashwini Mahangade

Actress Ashwini Mahangade : आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की, प्रत्येक गोष्ट अंधाऱ्या मार्गावर जात असं वाटतं. एक अशी वेळ येते, जेव्हा आपल्याला वाटतं की, आता काहीही उरलं नाही. अशा परिस्थितीत काही लोक आत्महत्या करण्याचा विचार करतात, परंतु कधी-कधी आपली जीवनाची दिशा बदलणारे एक छोटेसे शब्द किंवा एक व्यक्ती आपल्याला पुन्हा उभं करतात. अशाच एक प्रेरणादायक कथेची नायिका आहे, अभिनेत्री अश्विनी महांगडे.

अश्विनी महांगडे ही मूळची वाई, सताऱ्याची आहे. तिचे वडील रंगभूमीवरचे हौशी कलाकार होते. त्यामुळे शालेय शिक्षण घेत असताना, तिने नाटकांमध्ये भाग घेतला होता. नाटकाचा छंद तिला लहानपणापासूनच लागला होता. परंतु, पुढे वडिलांच्या इच्छेला झुगारून, तिने मुंबई गाठली. मात्र, या ठिकाणी पोहोचल्यावर तिच्या समोर अनेक अडचणी आल्या. अनेक ऑडिशन्स देऊनही तिला काम मिळेना, आणि यामुळे ती मानसिकदृष्ट्या थकली होती. त्यातूनच एक काळ असा आला की, तिच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार घोळत होता.

२५० कोटी खर्चुन बनवलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला, निर्मात्यांनीही कपाळावर हात मारला!

आयुष्य संपवायला निघालेली अश्विनी... 

एक दिवस अश्विनी मनाशी आयुष्य संपण्याचा विचार करून मीरा रोडच्या शिवार गार्डनमध्ये तलावाजवळ जात होती. त्याच वेळी तिची मैत्रिणी वैशाली भोसले आणि होणारा पती निलेश जगदाळे तिला सतत फोन करून समजावत होते. त्या दोघांनी 'टोकाचं पाऊल उचलण्याआधी नानांशी बोल', असा सल्ला दिला. नाना म्हणजेच अश्विनीचे वडील. अश्विनीने नानांशी बोलण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे तिच्या आयुष्याची दिशा बदलली. 'परमात्म्याने तुला काहीतरी चांगलं करायला इथे पाठवलं आहे. तू अजूनपर्यंत ते केलेलं नाहीयेस. मग तुझी सुटका इथून कशी होईल?' हे नानांचे शब्द तिच्या मनावर ठळक उमठले. नानांच्या मदतीने, अश्विनीने आयुष्याच्या संघर्षाला एक नवा वळण दिलं.

स्वतःला सगळ्यातून सावरलं अन्... 

तिने ठरवलं की, आता तिला आपल्या जीवनातील सर्व अडचणींना सामोरे जाऊन त्यांच्यावर मात करायची आहे. त्यानंतर तिने पुन्हा ऑडिशन्स दिल्या, वर्कआऊट करून स्वतःला फिट बनवलं आणि झपाटल्यासारखी कामाला लागली. त्याच वेळी, तिने चांगली चांगली पुस्तकं वाचून आत्मविश्वास देखील वाढवला. अश्विनीच्या या संघर्षाला, तिच्या आसपासच्या लोकांनीही भरभरून पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्यामुळेच ती आज खूप पुढे गेली.

Whats_app_banner