Swara Bhasker Wedding viral video: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद ही जोडी नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाच्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये हळद, मेहंदी, संगीत आणि रिसेप्शनच्या व्हिडीओंचा समावेश आहे. त्याचवेळी आता तिच्या पाठवणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहेर सोडून, सासरी जाताना स्वरा भावूक झालेली दिसत आहे. या भावनिक व्हिडीओवर तिचे वडील सी. उदय भास्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवरीबाई अर्थात अभिनेत्री स्वरा भास्कर हि तिच्या सासरी रवाना झाली आहे. यावेळी आई-वडिलांच्या घरातून स्वराची पाठवणी होत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री गडद गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. या प्रसंगी एक व्यक्ती कविता वाचताना दिसत आहे. हे पाहून स्वराही खूप भावूक झालेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये फहाद, स्वराचा भाऊ इशान भास्कर आणि आई इरा भास्कर देखील दिसत आहेत.
स्वराच्या एका मैत्रिणीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत लिहिले की, ‘स्वराला तिच्या विदाईच्या शुभेच्छा, आपल्या सर्वांसाठी एक भावनिक आणि जबरदस्त क्षण...’ मात्र, या फोटोमध्ये स्वराचे वडील दिसत नव्हते. या व्हिडीओवर स्वराच्या वडिलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, ‘हा हृदयस्पर्शी 'क्षण' शेअर केल्याबद्दल धन्यवाद @sinjini_m... स्वरा भास्करच्या लग्नाचा हा सोहळा आता संपत आला आहे. होय.. या माणसाकडे फ्रेम बाहेर राहण्यासाठी चांगले कारण होते. हा खरंच प्रत्येकासाठी भावनिक क्षण आहे, अगदी 'खडूस' वडिलांसाठी... आमच्या लाडक्या स्वरा भास्करची बिदाई’
नुकतेच स्वरा भास्करच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते, ज्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, जया बच्चन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांसारखे दिग्गज सामील होते.
संबंधित बातम्या