Swara Bhasker Baby Girl: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे चाहते तिच्या आई होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता स्वरा भास्करने तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. स्वरा भास्कर आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीनेच सोशल मीडियावरून केला आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या बाळासोबतचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
लेकीचे फोटो शेअर करत स्वराने एक प्रेमळ मेसेजही लिहिला आहे. स्वरा भास्कर हिने एका मुलीला जन्म दिला असून, लेकीचे नाव राबिया असे ठेवले आहे. अभिनेत्रीने हे क्युट फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक प्रार्थना ऐकली गेली, आशीर्वाद ही मिळाला, एका गाण्यानं वातावरण आनंदलं... आमची मुलगी राबिया हिचा जन्म २३ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. आम्ही कृतज्ञ आणि आनंदी आहोत. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. हे एक संपूर्ण नवीन जग आहे.’
या पोस्टमध्ये स्वराने आपल्या लेकीचे नावही सांगितले आहे. स्वराने तिच्या मुलीचे नाव राबिया ठेवले आहे. अभिनेत्रीने लेकीची झलक शेअर केली असली, तरी अद्याप तिचा चेहरा दाखवलेला नाही. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या मुलीला कुशी घेऊन घेऊन खूप आनंदी दिसत आहे. स्वरासोबत तिचा पती फहाद अहमद देखील दिसत आहे.
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद या वर्षी मार्चमध्ये दिल्लीत विवाहबद्ध झाले होते. याआधी या जोडप्याने कोर्ट मॅरेज केले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. या दोघांची प्रेमकहाणी २०२०मध्ये सुरू झाली. स्वरा आणि फहाद अहमद एका रॅली दरम्यान एकमेकांना भेटले होते. यानंतरही ते काही रॅलींमध्येही आमनेसामने आले. मार्च २०२०मध्येच फहादने स्वराला त्याच्या बहिणीच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. या दरम्यान त्यांच्यातील मैत्री फुलत गेली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
संबंधित बातम्या