आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. ती सध्या लाइमलाइट पासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी स्वराने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिने मुलीचे नाव राबिया असे ठेवले. आता स्वराने पहिल्यांदाच मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
स्वराने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टने मुलगी राहाला मीडियासमोर आणल्यानंतर सोशल मीडियावर राबाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद मुलीसोबत खेळताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर स्वराचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: ट्रेंडमध्ये असलेल्या ‘मोये मोये’चा अर्थ काय? गायकानेच केला खुलासा
स्वराच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने 'स्वरा आणि तुझ्या लाडक्या लेकीला नाताळाच्या खूप साऱ्या शुभेच्छा' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'किती सुंदर फोटो काढला आहे तुम्ही' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने 'तुम्ही नेहमीच असे हसत खेळत राहा' असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर राबिया चर्चेचा विषय ठरत आहे.
स्वराच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिने एका राजकीय पक्षात सक्रिय असणारा नेता फहाद अहमद याच्याशी लग्न करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. यावरुन तिला काही प्रमाणात ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता. आता स्वराने नाताळाच्या निमित्ताने शेयर केलेली पोस्ट ही चर्चेत आली आहे.
संबंधित बातम्या