Swara Bhaskar Wedding: स्वरा-फहादच्या रिसेप्शनला पोहोचले राहुल गांधी अन्...
Swara Bhaskar: गुरुवारी स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांचा लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या रिसेप्शनला राहुल गांधी यांनी हजेरी लावली.
देशातील सामाजिक व राजकीय घडामोडींवरील रोखठोक भूमिका आणि बेधडक मतांमुळं सातत्यानं चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातील फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकताच स्वराचे रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हजेरी लावली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
गुरुवारी दिल्लीमध्ये स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सोशल मीडियावर स्वराच्या रिसेप्शनमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वाचा: किडनीला इंफेक्शन झाल्यामुळे शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल, जाणून घ्या प्रकृतीविषयी
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने राहुल गांधी यांचा रिसेप्शनमधील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते सिक्योरिटीसोबत रिसेप्शनला पोहचतात. त्यांना स्वरा आणि फहादसोबत फोटो काढले आहेत. तसेच तेथे उपस्थित असलेल्या अनेकांशी गप्पा देखील मारल्या आहेत.
सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो पाहून अनेकांनी स्वराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने 'टुकडे टुकडे गॅंगचे लोक एकत्र आले आहेत' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'याचा अर्थ असा होतो की शाहीनबाग आणि जेएनयूला यांचा पाठिंबा आहे असा होतो' अशी कमेंट केली आहे.
काही दिवसांपूर्वी स्वराने सोशल मीडियावर पोस्ट करत कोर्टात लग्न केल्याची माहिती दिली होती. तिच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. स्वराचा पती फहाद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा राज्याचा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता आहे. २०२० साली झालेल्या एका आंदोलनाच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती.
विभाग