Swara Bhasker: अखेर स्वरा भास्कर अडकली लग्नबंधनात, फोटो चर्चेत
Swara Bhasker: स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वी कोर्टात लग्न केले होते. आता तिने पारंपरिक पद्धतीने विवाह केला आहे. तिच्या लग्नातील फोटो समोर आले आहेत.
देशातील सामाजिक व राजकीय घडामोडींवरील रोखठोक भूमिका आणि बेधडक मतांमुळं सातत्यानं चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने कोर्टत जाऊन रजिस्टर पद्धतीने विवाह केला होता. आता तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
समाजवादी पक्षाचा एक कार्यकर्ता फहाद अहमद याच्यासोबत तिनं लग्नगाठ बांधली आहे. स्वराने ट्वीट करून फहादसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये स्वराने लाल रंगाची साडी नेसली आहे. त्यावर ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये स्वरा अतिशय सुंदर आहे. तर फहादने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आणि त्यावर निळ्या रंगाची जिन्स घातली आहे. या जोडीवर अनेकांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
वाचा: 'आई कुठे काय करते'मधील संजनाला मिळाले दोन पुरस्कार
काही दिवसांपूर्वी स्वराने सोशल मीडियावर पोस्ट करत कोर्टात लग्न केल्याची माहिती दिली होती. तिच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. 'अनेकदा आपल्या जवळ किंवा अगदी सोबत असलेली गोष्ट आपण दूरवर कुठंतरी शोधत असतो. आम्ही देखील अशाच शोधात होतो, प्रेमाच्या. आधी आम्हाला आमच्यातली मैत्री गवसली आणि त्यातून मग आम्ही दोघे एकमेकांना सापडलो. फहाद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा राज्याचा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता आहे. २०२० साली झालेल्या एका आंदोलनाच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती. याच आंदोलनात दोघांनी पहिला सेल्फी एकत्र काढला होता. विशेष विवाह कायद्यांतर्गत ६ जानेवारी २०२३ रोजी आम्ही न्यायालयात विवाह नोंदणी केली आहे' असे ट्वीट स्वराने केले होते.
कोण आहे फहाद अहमद?
फहाद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा राज्याचा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता आहे. २०२० साली झालेल्या एका आंदोलनाच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती.