गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. आता अखेर सोनाक्षी बॉयफ्रेंड जहीर इक्बालशी लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाक्षीला शुभेच्छा देताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री स्वरा भास्करने देखील प्रतिक्रिया दिली आहे. पण स्वराने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायमच चर्चेत असते. ती नेहमी सामाजिक विषय असो किंवा इतर कोणतीही चर्चा असो त्यावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. आता स्वराने सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना तिने अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानचे देखील उदाहरण दिले आहे.
वाचा: ‘या’ दिवशी पार पडणार सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालची हळद; ५०हून कमी लोकांमध्ये होणार सोहळा!
स्वरा भास्कर आपल्या मनातील गोष्टी बोलायला मागेपुढे पाहत नाही. आता तिने सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चेवर संताप व्यक्त केला आहे. कनेक्ट साइनशी बोलताना स्वरा भास्कर म्हणाली, "आधुनिक भारतातील सर्वात मोठी मिथक म्हणजे 'लव्ह जिहाद', जिथे एक हिंदू मुलगी मुस्लीम व्यक्तीशी लग्न करते. हे मलाही लागू पडते. काही शहरांमध्ये व्हॅलेंटाईन डेला वेगवेगळ्या धर्माच्या जोडप्यांना मारहाणही केली जाते. माझ्या लग्नाच्या वेळीही अनेक तज्ज्ञांनी त्यांचे मत मांडले होते. पण आम्ही आमचा निर्णय घेतला होता."
वाचा: 'कथेमध्ये आम्ही थोडा बदल करायचो', शाहरुख खान लेक अबरामला सांगायचा महाभारतातील कथा
'आपण येथे दोन प्रौढ व्यक्तींविषयी बोलत आहोत. ते त्यांच्या खासगी आयुष्यात काय करत आहेत, त्यांना लग्न करायचे आहे की नाही हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे. आज ते समाजात एकत्र राहात आहे, त्यांनी कोर्टात लग्न केले आहे. त्यामुळे त्यांना कोणीही समजावण्याची गरज नाही. हे सोनाक्षीचे आयुष्य आहे. तिने तिचा जोडीदार निवडला आहे. त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांची परवानगी आहे की नाही हा त्यांचा विषय आहे. त्यामुळे या वादावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे' असे स्वरा म्हणाली.
वाचा: ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात, जुई गडकरीने पोस्ट करत केले आवाहन
पुढे स्वरा म्हणाली की, भारत आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये अशा गोष्टी अधिक घडतात, जिथे लोक इतरांच्या कामात नाक जास्त घालतात. थांबा, जेव्हा त्यांना मुलं होतील तेव्हा त्यांच्या नावांबद्दल वेगळी चर्चा होईल. करीना आणि सैफच्या मुलांची पण चर्चा सुरु होती. माझ्या बाळाच्या वेळी देखील अशा चर्चा सुरु होत्या. हा निव्वळ मूर्खपणा आहे. हे सगळं लवकर संपणारे नाही.
संबंधित बातम्या