Swara Bhaskar Wedding: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद ही जोडी नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाच्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये हळद, मेहंदी, संगीत आणि रिसेप्शनच्या व्हिडीओंचा समावेश आहे. त्याचवेळी आता तिच्या पाठवणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहेर सोडून, सासरी जाताना स्वरा भावूक झालेली दिसत आहे.