बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. ती सतत सामाजिक विषयांवर परखडपणे तिचे मत मांडत असते. अनेकदा तिला तिच्या अशा कृतीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र स्वरा याकडे फार लक्ष देत नाही. आज ९ एप्रिल रोजी स्वराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
स्वराने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. जवळपास गेली १४ वर्षे ती बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. मात्र तिचे काही चित्रपट हिट ठरले तर काही फ्लॉप ठरले आहेत. १४ वर्षात स्वराने केवळ १४ चित्रपटात काम केले. त्यामधील ९ चित्रपट फ्लॉप ठरले. तरी देखील स्वराकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे.
वाचा: 'पुष्पा २'चा टीझर पाहिलात का? अल्लू अर्जुनने जिंकली चाहत्याची मने
९ एप्रिल १९८८ साली स्वराचा दिल्लीतील एका आर्मी कुटुंबात जन्म झाला. तिचे वडील इंडियन नेवीमध्ये ऑफिसर होते आणि आई जेएनयूची प्रोफेसर. करिअरच्या सुरुवातीला स्वराने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम केले. त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली. आज स्वराकडे ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ती एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये मानधन घेते. तसेच ती काही जाहिरांतीची ब्राँड एम्बेसिडर आहे.
संबंधित बातम्या