मराठी चित्रपटसृष्टीमधील चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता स्वप्नील जोशी ओळखला जातो. स्वप्नील नेहमीच त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून स्वप्नील जोशीचे वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत होते. हे फोटो त्याचे 'बाई गं' या चित्रपटातील असल्याचे स्पष्ट झाले. या चित्रपटात स्वप्नील पाच अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. आता या चित्रपटाचा मजेशीर टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ, ही गाठ कधीही कुठेही कशीही जुळते, पण ही गाठ किती वेळ टिकेल हे मात्र सांगणं कठीण आहे. आता आपलं हेच प्रेम टिकवायला एका नवऱ्याला चक्क ५ जन्मा आधीच्या आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण या इच्छा तो पूर्ण करू शकेल का? हे आपल्याला 'बाई गं' या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
वाचा: दाक्षिणात्य हॉरर सिनेमा 'नमस्ते घोस्ट' घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर पाहाता येणार
'बाई गं' चित्रपटाच्या १ मिनिटे ७ सेकंदाच्या टीझरमध्ये स्वप्नील जोशीला किती कसरत करावी लागते हे दिसत आहे. तो एका मद्यधुंद अस्थेत देवाकडे पत्नीला परत मागतो. तेव्हा देव प्रसन्न होऊन त्याला तुझ्या पाच जन्मातील बायका परत करत आहे असे सांगतो. त्यानंतर त्या बायकांच्या इच्छा पूर्ण झाल्या शिवाय त्या जाणार नाहीत असे ही स्पष्ट करतो. स्वप्नील मद्यधुंद अवस्थेत होकार तर देतो. पण दुसऱ्यादिवशीच त्याची तारेवरची कसरत पाहायला मिळते. आता चित्रपटात पुढे काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: शुटिंगदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शकाला दादा कोंडकेंनी खायला घातली होती बटाट्याची भाजी, वाचा किस्सा
या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे. "बाई गं" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. हा धम्माल चित्रपट १२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: शिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी दोन हात, झी मराठी मालिकांमध्ये 'वटपौणिमा' विशेष भाग
संबंधित बातम्या