मराठी चित्रपटसृष्टीमधील चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता स्वप्नील जोशी ओळखला जातो. स्वप्नील नेहमीच त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून स्वप्नील जोशीचे वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत होते. हे फोटो त्याचे 'बाई गं' या चित्रपटातील असल्याचे स्पष्ट झाले. या चित्रपटात स्वप्नील पाच अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहे.
'बाई गं' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्वप्निल जोशीची तारेवरची कसरत पाहायला मिळत आहे. एकदा दारुच्या नशेत देवाकडून मिळालेले वरदान हे किती महागात पडते हे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. कॉमेडी आणि भावनेने भरपूर असा हा ट्रेलर असून यात शेवटी स्वप्नीलला बाईच्या मनातले जाणून घेण्यासाठी बाईचे रुप धारण करावे लागल्याचे दिसत आहे. या चित्रपटाच्या शेवटी स्वप्निल त्याच्या आधीच्या पाच जन्मातील बायकांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करतो का? हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागणार आहे.
वाचा: शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात का दाखल व्हावं लागलं?; त्यांनी स्वत:च दिली माहिती
नवरा बायकोचं नातं म्हणजे, दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच, असच काही घडलय स्वप्नील जोशी सोबत. वर्तमान आयुष्यात तरी त्याला बायकोचं मन काही कळालं नाही, मागच्या ५ जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा तो कसा पूर्ण करतो हे 'बाई गं' चित्रपटात पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: हनीमूनला गेलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीरचे झाले भांडण, समोर आला व्हिडीओ
या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे. "बाई गं" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. हा धम्माल चित्रपट १२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: कधीकाळी दोन वेळचे अन्नही मिळत नसणाऱ्या भारती सिंहकडे आज आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती