मराठी इंडस्ट्रीमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टवर प्रेक्षकांनी प्रेम केले आहे. स्वप्नील सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा त्याच्या एका व्यक्तामुळे रंगला आहेत. त्याने "आता लव्ह ट्रँगल बदलावा लागणार" असे म्हटले आहे.
स्वप्नील जोशीचा एक नवाकोरा चित्रपट "बाई गं" हा तुमच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील नेहमीच काहीतरी वेगळं करत असतो आणि आता "बाई गं" हा देखील त्याचा वेगळा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने "आता लव्ह ट्रँगल बदलावा लागणार" असे वक्तव्य केले आहे. "येणाऱ्या काळात लव ट्रँगल बदलावा लागणार असून मी तब्बल ६ अभिनेत्रीच्या सोबतीने एकटा हिरो म्हणून बाई गं या चित्रपटामध्ये दिसणार आहे. कायम लव्ह स्टोरी करताना लव्ह ट्रँगल होताना दिसायचा. पण आता हे चित्र थोड बदलणार आहे आणि मी वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्री सोबत दिसणार आहे. विभिन्न विचाराच्या आणि विविध वयोगटातील अभिनेत्री सोबत काम करण्याचा अनुभव देखील तितकाच कमालीचा होता. या सहा अभिनेत्री सगळ्या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नेहा खान, नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहेरे अश्या अफलातून अभिनेत्रीची फौज बाई गं मध्ये दिसणार आहे" असे स्वप्नील जोशी म्हणाला.
वाचा: सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज आलं समोर, आरोपी दुचाकीवरून आला अन्...
एकंदरीतच स्वप्नीलने केलेले विधान हे त्याच्या आगामी चित्रपटाशी संबंधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वप्नीलच्या "बाई गं" चित्रपटाविषयी सगळ्यांच्या उत्सुकता वाढल्या आहेत. हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार? असा प्रश्न सगळ्यांना पडला असून लवकरच स्वप्नील या विषयी माहिती देणार आहे. या चित्रपटात सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नेहा खान, नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहेरे या सहा अभिनेत्री दिसणार आहेत. २०२४ ची सुरुवात स्वप्नील "नाच गं घुमा" या चित्रपटापासून होत असून येणाऱ्या वर्षात तो अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: 'तारक मेहता..' मालिकेतील सोनूचा एअरपोर्टवर अतरंगी कारनामा, काही सेकंदामध्येच तयार केला टॉप