सहा अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी करतोय रोमॅन्स, नेमकी काय आहे भानगड जाणून घ्या ?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सहा अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी करतोय रोमॅन्स, नेमकी काय आहे भानगड जाणून घ्या ?

सहा अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी करतोय रोमॅन्स, नेमकी काय आहे भानगड जाणून घ्या ?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 03, 2024 06:45 PM IST

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता स्वप्नील जोशी हा एक एक अभिनेत्रीसोबत दिसत होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत होते. आता या फोटोमागचे सत्य समोर आले आहे.

Swapnil Joshi: स्वप्नील जोशी
Swapnil Joshi: स्वप्नील जोशी

मराठी चित्रपटसृष्टीमधील चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता स्वप्नील जोशी ओळखला जातो. स्वप्नील नेहमीच त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून स्वप्नील जोशीचे वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत होते. या फोटोंमागची नेमकी काय भानगड आहे असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडत होता. आता सत्य समोर आले आहे. स्वप्नीलचे हे फोटो त्याच्या आगामी चित्रपटामधील आहेत. या चित्रपटाचे नाव 'बाई गं' असे आहे.

'बाई गं' चित्रपटात काय पाहायला मिळणार?

आतापर्यंत कायम लव्हस्टोरी मध्ये लव्ह ट्रँगल होताना दिसायचा पण आता हे चित्र थोड बदलणार आहे. एक अभिनेता आणि सोबत तब्बल ६ नायिका ही संकल्पनाच या सिनेमाची उत्सुकता वाढविणारी आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, यात हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.
वाचा: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्रीवेडिंगमधील पहिला व्हिडीओ आला समोर, 'बॅकस्ट्रीट बॉईज'चा धम्माल परफॉर्मन्स

कोणते कलाकार दिसणार

दमदार कलाकारांची टीम ही 'बाई गं' या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू ठरणार आहे. यामध्ये स्वप्नील जोशी मुख्य अभिनेता असून यामध्ये तो वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे , अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान अशा अफलातून अभिनेत्री 'बाई गं' चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. सोबतच सागर कारंडे देखील विशेष भूमिकेत असणार आहे. एकंदरीत चित्रपटाची स्टारकास्ट पाहात प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाचा: दाक्षिणात्य अभिनेत्याने शेजारी उभ्या असलेल्या अभिनेत्रीला दिला धक्का, Viral Videoने वेधले सर्वांचे लक्ष

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत एक नवी कोरा, धमाल असलेला 'बाई गं' हा नवा चित्रपट येत्या १२ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती डॉ .आशिष अग्रवाल, नितीन प्रकाश वैद्य सोबत ओ एम जी मीडिया व्हेंचर्स यांनी केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे.
वाचा: मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही; "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील"चा ट्रेलर प्रदर्शित

Whats_app_banner