Swanandi Tikekar : अखेर यांचही जमलं! अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा होणारा पतीही आहे सुप्रसिद्ध गायक
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Swanandi Tikekar : अखेर यांचही जमलं! अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा होणारा पतीही आहे सुप्रसिद्ध गायक

Swanandi Tikekar : अखेर यांचही जमलं! अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा होणारा पतीही आहे सुप्रसिद्ध गायक

Published Jul 21, 2023 08:19 AM IST

Swanandi Tikekar Releationship: अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते.

Swanandi Tikekar
Swanandi Tikekar

Swanandi Tikekar Relationship: मराठमोळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने आपण प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने आमचं ठरलं, असं म्हणत आपलं प्रेम जाहीर केलं आहे. यासोबतच स्वानंदीने आपल्या आयुष्यातील या खास व्यक्तीचा फोटो देखील शेअर केला आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर गायक आशिष कुलकर्णी याला डेट करत आहे. ‘इंडियन आयडॉल’मधून प्रसिद्ध झालेला आशिष कुलकर्णी आपल्या सुमधुर आवाजाने सगळ्यांनाच भुरळ घालत आहे. आता त्यांच्या डेटिंगच्या वृत्तामुळे दोघांचाही चाहत्यांना आनंद झाला आहे.

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने आपल्या आयुष्यातील ही सगळ्यात आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यावेळी स्वानंदीने स्वतःचा आणि आशिष कुलकर्णी याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘आमचं ठरलं!’ असं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर आता चाहते आणि कलाकार मित्रमंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी तिला आता लग्न कधी करणार, असा प्रश्न देखील विचारला आहे.

अभिनेता उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांची लेक स्वानंदी टिकेकर ही देखील एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि उत्तम गायिका आहे. अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या स्वानंदीने काही शोचे सूत्रसंचालन देखील केले आहे. स्वानंदीला देखील गायनाची आवड आहे. तिने एका शोमध्ये भाग देखील घेतला होता. तर, तिने आता आयुष्याचा जोडीदार निवडताना देखील संगीतक्षेत्राचा आधार घेतला आहे. आपल्या सुमधुर गाण्यांनी सगळ्यांनाच भुरळ घालणाऱ्या आशिष कुलकर्णीने स्वानंदीला देखील मंत्रमुग्ध केलं आहे.

स्वानंदी आणि आशिष गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असावेल, असा कयास चाहते बांधत आहेत. मात्र, अद्याप स्वानंदी आणि आशिष या दोघांनी इतर कोणत्याही गोष्टीचा खुलासा केलेला नाही. त्यांनी केवळ आता आपली सिक्रेट रिलेशनशिप जगजाहीर केली आहे.

Whats_app_banner