मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Swanandi Berde: लक्ष्याची लेक चित्रपटात झळकणार; ‘या’ अभिनेत्यासोबत करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री!

Swanandi Berde: लक्ष्याची लेक चित्रपटात झळकणार; ‘या’ अभिनेत्यासोबत करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 21, 2024 05:05 PM IST

Swanandi Berde Film Debut: सुपरस्टार दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे आगामी मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Swanandi Berde Film Debut
Swanandi Berde Film Debut

Swanandi Berde Film Debut: बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स सर्रास मोठ्या पडद्यावर पदार्पण करताना दिसतात. आता मराठी मनोरंजन विश्वातही काही स्टारकिड्स एन्ट्री करणार आहेत. प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे आता मनोरंजन विश्वात एन्ट्री करत असून, लवकरच ती एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. नुकताच तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत टीव्हीचा लाडका कृष्ण म्हणजेच अभिनेता सुमेध मुद्गलकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

प्रेमाची परिभाषाही प्रत्येकासाठी निराळी असते. बरेचदा हे प्रेम एकतर्फी असल्याचंही पाहायला मिळालं आहे. या एकतर्फी प्रेमामुळे आलेल्या अडचणी, संकट कित्येकांनी जवळूनही पाहिली आहेत. अशातच एका अनोख्या प्रेमाची आगळीवेगळी लव्हस्टोरी 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे. योगेश जाधव दिग्दर्शित प्रेमाची निराळी व्याख्या सांगणाऱ्या या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज आहे. चित्रपटाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरने यातील कलाकारांची पहिली झलक दाखवली आहे.

Chala Hawa Yeu Dya: ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला मोठा धक्का! ‘कॅप्टन ऑफ द शीप’ शोमधून बाहेर पडणार?

लक्ष्याची लेक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार

सुपरस्टार दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याआधी स्वानंदीने नाटक, एकांकिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मुख्य भूमिका असलेला स्वानंदीचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर, स्वानंदीच्या जोडीला या अभिनेता सुमेध मुदगलकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सुमेधने याआधी बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आता स्वानंदी व सुमेध यांची नवीकोरी जोडी 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री श्वेता परदेशी ही सहकलाकार म्हणून या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

स्वानंदी आणि सुमेध यांच्यासह या नव्या चित्रपटात विद्याधर जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीचा नव्या प्रेमाचा रंग 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून येत्या १ मार्चपासून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन' अंतर्गत, संदीप पांडुरंग जोशी व कुणाल दिलीप कंदकुर्ते निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी सांभाळली आहे.

IPL_Entry_Point