देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहाला मिळत आहे. १३ मे रोजी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, शिर्डी या भागांमध्ये मतदान पार पडल्याचे पाहायला मिळाले. अनेक मराठमोळ्या कलाकारांनी देखील त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. पण अभिनेता सुयश टिळकला मात्र यावेळी मतदान करता आले नाही. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.
सुयशने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने “गेल्यावेळी मतदान केले तेव्हा माझ्या नावात चूक केली होती. त्यावेळी ती चूक सुधारण्यासाठी मी अर्ज दिला होता. यावेळी सुदैवाने ऑनलाईन पोर्टलवर खूप शोधल्यावर शेवटी माझे नाव सापडले असताना त्याच पुन्हा तीच चूक केलेली होती. वोटिंग बूथला मी सकाळी ७ वाजता पोहोचलो. माझ्या ऑनलाईन पोर्टलवरच्या यादीतील नाव नोंदीपेक्षा त्याजागी बूथवर असलेल्या यादीत मात्र वेगळेच नाव आढळले. म्हणून जवळपास ३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. अचानक यावेळी काही जणांचा मतदार संघच बदलला आहे हे तेथे गेल्यावर समजले, म्हणून वेगळ्या मतदार संघात पण चौकशी केली, शोधाशोध केली” असे सुयश म्हणाला.
वाचा: 'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर
पुढे पोस्टमध्ये तो म्हणाला, “गेली अनेक वर्ष मी मतदान न चुकता करत आलो आहे. मात्र, यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायाने देखील मतदान करू दिले नाही याची खंत वाटते आणि वाटत राहील.”
वाचा: विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी
सुयशची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी कमेंट केल्या. एका यूजरने “ज्यांचे नाव यादीत नाही असे सगळे लोक मतदान केंद्रावर form no 17 भरून आणि आपले वोटिंग कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत” असे सांगितले. चर दुसऱ्या एका यूजरने “सुयश भाऊ आज मला पण खूप वाईट अनुभव आला” अशी कमेंट केली आहे.
वाचा: क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
मराठी कलाविश्वातील विविध मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये सुयशने काम केले आहे. पण ‘का रे दुरावा’ या मालिकेने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले. या मालिकेतील त्याची जयराम ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. आता लवकरच तो 'अबोली' या मालिकेत दिसणार आहे. पण या मालिकेत तो कोणती भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.