मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sussane Khan: सुझान खान एअरपोर्टवरुन माघारी, काय झालं नेमकं?

Sussane Khan: सुझान खान एअरपोर्टवरुन माघारी, काय झालं नेमकं?

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 31, 2023 10:27 AM IST

Sussane Khan return From Airport: अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान ही अर्सलान गोणीसोबत विमानतळावर दिसली होती. मात्र, ती गेटवरुनच परत येताना दिसली.

Sussane Khan
Sussane Khan

सध्या सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळे प्लान करताना दिसत आहेत. बॉलिवूड कलाकार तर परदेशात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जाताना दिसत आहेत. अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान देखील बॉयफ्रेंड अर्सलन गोणीसोबत परदेशात निघाली होती. मात्र, मुंबई विमानतळावरुन ती परत येताना दिसली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.

शनिवारा सकाळी सुझान खान आणि अर्सलन गोणी हे मुंबई विमानतळावर दिसले होते. दोघेही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी परदेशात रवाना होणार होते. विमानतळाच्या गेटवर येताचा फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो काढले. पण, दोघांनीही ओळखपत्र दाखवले. त्यानंतर सुझानने तिचा पासपोर्ट दाखवला आणि अर्सलनला त्याचा पासपोर्ट सापडत नव्हता. त्यावेळी दोघांमध्ये काही तरी संभाषण झाले आणि ते पुन्हा गाडीमध्ये येऊन बसले. अर्सलन पासपोर्ट विसरल्यामुळे त्यांना परदेशातील दौरा रद्द करावा लागला.
वाचा: मॅडम बटण तर लावा; जंगल सफारीला गेलेली अभिनेत्री ड्रेसमुळे झाली ट्रोल

विमानतळावरुन परत येताना अर्सलन आणि सुझानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने हृतिक रोशनचा उल्लेख करत, ‘क्रिशला सांगितले असते तर त्याने आणून दिला असते’ असे म्हटले. दुसऱ्या एका यूजरने, ‘हृतिक रोशन असता तर क्रिश बनून पासपोर्ट आणून दिला असता’ अशी कमेंट केली आहे.

हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. या दोघांना दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर सुझान ही अर्सलानला डेट करतेय. तो बिग बॉस फेम अली गोणीचा भाऊ आहे. तर दुसरीकडे हृतिक हा अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. हृतिक आणि सुझान यांच्यात घटस्फोटानंतरही चांगली मैत्री असल्याचं पहायला मिळते. इतकच नव्हे तर हृतिक आणि सबाच्या फोटोंवर सुझान प्रेमाने कमेंट्स करतानाही दिसते. या चौघांच्या मैत्रीला नेटकऱ्यांनी अनेकदा ट्रोल केले.

WhatsApp channel