Binge Watch : अडीच तासांचा भन्नाट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट, शेवट पाहून होईल डोक्याचा भुगा! तुम्ही पाहिलाय का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Binge Watch : अडीच तासांचा भन्नाट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट, शेवट पाहून होईल डोक्याचा भुगा! तुम्ही पाहिलाय का?

Binge Watch : अडीच तासांचा भन्नाट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट, शेवट पाहून होईल डोक्याचा भुगा! तुम्ही पाहिलाय का?

Jan 24, 2025 03:05 PM IST

Suspense Thriller Movie : आजकाल बहुतेक लोकांना साऊथचे चित्रपट पाहायला आवडतात. तुम्ही ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाच्या शोधात असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम चित्रपट घेऊन आलो आहोत.

अडीच तासांचा भन्नाट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट, शेवट पाहून होईल डोक्याचा भुगा! तुम्ही पाहिलाय का?
अडीच तासांचा भन्नाट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट, शेवट पाहून होईल डोक्याचा भुगा! तुम्ही पाहिलाय का?

Suspense Thriller Movie Binge Watch : गेल्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 'महाराजा' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विजय सेतुपती यांच्या या चित्रपटाला खूप प्रेम मिळाले. हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तुफान गाजला होता. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक ब्लॉकबस्टर ॲक्शन-थ्रिलर चित्रपट घेऊन आलो आहोत. अडीच तासांचा हा चित्रपट पाहताना तुम्हीही तुमच्या जागेवरून उठणे देखील विसराल. हा चित्रपट 'महाराजा'लाही टक्कर देणारा आहे. इतकंच नाही तर, या चित्रपटाचा क्लायमॅक्स तुमच्या डोक्याचा नक्कीच भुगा करेल.

काय आहे या चित्रपटाचे नाव?

आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव 'थेरी' आहे, जो २०१६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात थलापती विजय मुख्य भूमिकेत आहे, तर समंथा रुथ प्रभू आणि एमी जॅक्सन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची कथा जबरदस्त आहे आणि त्याचा क्लायमॅक्स नक्कीच तुम्हाला जोरदार धक्का देण्यासाठी पुरेसा आहे.

बॉक्स ऑफिसवर झालेले जबरदस्त कलेक्शन!

अभिनेता थलापती विजयच्या 'थेरी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींची कमाई केली होती. चित्रपटाची कथा केरळमध्ये बेकरी चालवणाऱ्या एका व्यक्तीची आहे. या व्यक्तीला हिंसा अजिबात आवडत नाही. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून, थलापती विजय आहे. तो या चित्रपटात ५ वर्षांच्या मुलीच्या बापाची भूमिका साकारताना दिसला आहे.

मल्टी लेवल मार्केटिंग प्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथवर गुन्हा दाखल; कोट्यवधी रुपयांची झाली होती फसवणूक

चित्रपटात ॲमी जॅक्सनने थलापती विजयच्या मुलीच्या शिक्षकीचे जोसेफची भूमिका साकारली आहे. तर, सामंथा अभिनेत्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळतो, जेव्हा जोसेफला कळते की बेकरी चालवणारा हा माणूस पूर्वी एक धाडसी पोलीस अधिकारी होता, जो त्याच्या कुटुंबाचा खून करणाऱ्या आरोपीचा बदला घेण्यासाथी आला आहे.

अॅटलीने केले दिग्दर्शन!

थलापती विजयचा 'थेरी' हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. त्याचे हिंदी व्हर्जनही ओटीटीवर उपलब्ध आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स इतका जबरदस्त आहे की, तुम्ही तो अजिबात चुकवू शकत नाही. महेंद्रन यांनी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक अॅटली यांनी हा जबरदस्त चित्रपट बनवला आहे. याच चित्रपटाचा हिंदी रिमेक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

Whats_app_banner