जर तुम्हाला हॉरर, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेले चित्रपट पाहायला आवडत असतील, तर तुम्ही काही गाजलेले चित्रपट आणि सीरिज नक्कीच बघितल्या असतील. हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक भयपट आणि थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आज आपण ज्या सीरिजबद्दल बोलणार आहोत, ते १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी आणि कमकुवत हृदय असलेल्यांना लोकांनी तर अजिबातच बघू नयेत, असे आहेत. इतकंच नाही तर, ज्यांना हे चित्रपट आणि वेब सीरिज बघायच्या आहेत, त्यांनीही त्या एकट्यात पाहू नये. अन्यथा, तुम्हाला रात्री झोपणे देखील कठीण होईल. विशेष म्हणजे या प्रत्येक चित्रपट आणि सीरिजचे कथानक खूप वेगळे आहे.
‘द हॉन्टिंग ऑफ हिल हाउस’ ही वेब सीरिज २०१८मध्ये रिलीज झाली होती. तुम्ही हॉररप्रेमी असाल आणि अजूनही ही सीरिज पाहिली नसेल, तर आता ती नक्कीच पाहू शकतात. यात भूतकाळ आणि वर्तमानात अडकलेल्या कुटुंबाची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांच्या आयुष्यात अनेक धोकादायक घटना घडत असतात. यामध्ये असे काही सीन्स आहेत जे तुम्हाला थक्क करतील. ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
२०२४मधील सर्वात गाजलेल्या हॉरर सीरिजपैकी एक 'ड्रॅक्युला' ही प्रत्येक हॉरर प्रेमीची पहिली पसंती नक्कीच असेल. यातील प्रत्येक दृश्याच्या पार्श्वभूमीचा आवाज ऐकून तुम्हाला एक वेगळीच भीती वाटू शकते. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.
नेटफ्लिक्सच्या हॉरर सीरिजपैकी एक 'टाइपरायटर' ही कमजोर हृदय असलेल्या लोकांनी तर पाहूच नये. कथेपासून ते वेब सीरिजच्या सीन्सपर्यंत खूप भीतीदायक गोष्टी यात आहेत. ही सीरिज रात्री एकट्याने कधीही पाहू नका. या सीरिजची कथा एका कुटुंबावर आधारित आहे, जी सुट्टी घालवण्यासाठी गोव्यातील एका निर्जन ठिकाणी 'बार्डेझ व्हिला' या हवेलीत राहायला जाते.
नेटफ्लिक्सची 'द मिडनाईट क्लब' रिलीज झाली, तेव्हा लोकांनी ती अपूर्णच सोडली. या वेब सीरिजची कथा इतकी हॉरर आहे की, ती पाहिल्यानंतर तुमची झोप उडून जाईल. ही एक अमेरिकन हॉरर मिस्ट्री थ्रिलर वेब सीरिज आहे, जी माइक फ्लानागन आणि लीह फाँग यांनी बनवली आहे. ‘द मिडनाइट क्लब’ या कादंबरीच्या कथेवर ही वेब सीरिज आधारित आहे.
‘द कॉनज्योरिंग’ ही सीरिज जेम्स वॅन यांनी दिग्दर्शित केली होती आणि जगातील सर्वोत्तम हॉरर प्रोजेक्ट्सच्या यादीतही तिचा समावेश आहे. यामध्ये एक जोडपे मुलांना घरात कैद करणाऱ्या अनेक आत्म्यांशी बोलून त्यांची सुटका करतात. ही सीरिज बघताना नक्कीच थरकाप उडेल.
संबंधित बातम्या