बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन महत्त्वाच्या भूमिकेत असणारी 'आर्या' ही सीरिज बरीच गाजली आहे. या सीरिजच्या दोन्ही सिझने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता या सीरिजचा तिसरा आणि शेवटचा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या सिझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहाताना अंगावर शहारे येतात.
'आर्या ३' या सीरिजच्या ट्रेलरची सुरुवात ही सुष्मिताने होते. सुष्मिताचा हात बंदूक असून ती लोड करताना दिसते. त्यानंतर सुष्मिता कोणावर तरी निशाणा साधते. ती अनेक व्यवसाय करत आहे पण ती स्वतःच या व्यवसायाच्या जाळ्यात अडकत आहे. त्यामुळे तिची मुलेही तिच्यापासून दूर जात आहेत. आता ती तिन्ही मुलांचे रक्षण कसे करते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच ट्रेलरमधील "मेरी कहानी का हर पन्ना खून से लिखा था. पर सोचा नहीं था कि उसका अंत मेरे ही खून से होगा" हा सुष्मिताचा डायलॉग भलताच हिट होताना दिसत आहे. ट्रेलरमधील अॅक्शन सीन्स हे लक्ष वेधी आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आता सीरिजबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
वाचा: 'बिग बॉस १७'मध्ये नवा ट्विस्ट, अंकिता लोखंडे रेसमधून बाहेर?
सुष्मिताने 'आर्या ३'चा ट्रेलर स्वत: सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करत तिने "तुमची आर्या ९ फेब्रुवारी २०२४ ला परत येत आहे!!!" असे कॅप्शन दिले आहे. याचा अर्थ ही सीरिज ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
'आर्या ३' या सीरिजमध्ये सुष्मितासोबत इला अरुण, सिकंदर खेर, इंद्रनील सेनगुप्ता, विकास गुप्ता, माया सराव, गीतांजली कुलकर्णी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सीरिजचा ट्रेलर पाहाता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.