Sushmita sen And Rohman Shawl Video: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या 'आर्या ३' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमधील सुष्मिताचे आर्या हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. प्रेक्षक या सीरिजच्या आगामी भागांची आतुरतेने वाट पाहात आहेत. या सगळ्या चर्चा सुरु असताना सुष्मिता खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत दिसली.
काल विशाल गुरनानी आणि जुही पारेख यांनी दिवाळी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला सुष्मिता सेनने रोहमन शॉलसोबत हजेरी लावली. यावेळी सुष्मिताने रोहमनच्या हातात हात पकडून फोटोग्राफर्सला पोझ दिल्या. यावेळी सुष्मिताने काळ्या रंगाची साडी नेसली होती. तर रोहमनने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट आणि त्यावर जॅकेट घातले होते. दोघेही अतिशय सुंदर दिसत होते. सोशल मीडियावर दोघांचा एकत्र व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरुन त्यांचा पॅचअप झाल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: बाळासाहेब ठाकरे आज हवे होते; अजिंक्य देव असं का म्हणाले?
डिसेंबर २०२१मध्ये सुष्मिताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रोहमन शॉलसोबत तीन वर्षांपासून असलेले नाते तुटल्याचे सांगितले होते. त्यानंतरही दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर सुष्मिता ललित मोदीला डेट करत होती. या सगळ्यानंतर आता सुष्मिता पुन्हा रोहमनसोबत आनंदी असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुष्मिता आणि रोहमनचा पॅचअप झाल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. याबाबत आता सुष्मिताच्या प्रतिक्रियेची सर्वजण वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या