‘मिस युनिव्हर्स’ जिंकून पूर्ण झाला ३० वर्षांचा प्रवास! सुष्मिता सेनने मानले ‘या’ व्यक्तीचे आभार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘मिस युनिव्हर्स’ जिंकून पूर्ण झाला ३० वर्षांचा प्रवास! सुष्मिता सेनने मानले ‘या’ व्यक्तीचे आभार

‘मिस युनिव्हर्स’ जिंकून पूर्ण झाला ३० वर्षांचा प्रवास! सुष्मिता सेनने मानले ‘या’ व्यक्तीचे आभार

Published May 21, 2024 09:57 AM IST

सुष्मिता सेनने जगभरातील आपले चाहते, मित्र, कुटुंबीय आणि हितचिंतकांचे आभार मानले. या प्रत्येकाने तिच्या आयुष्यात बदल घडवून आणला, असे ती म्हणाली.

‘मिस युनिव्हर्स’ जिंकून पूर्ण झाला ३० वर्षांचा प्रवास!
‘मिस युनिव्हर्स’ जिंकून पूर्ण झाला ३० वर्षांचा प्रवास!

अभिनेत्री सुष्मिता सेन हिने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकल्याला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. सुष्मिताने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आणि एक लांबलचक नोट लिहिली. सुष्मिता २१ मे १९९४ रोजी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. 

या थ्रोबॅक फोटोमध्ये सुष्मिता एका चिमुकलीला हातात घेऊन तिच्याकडे पाहून हसताना दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि सॅश परिधान केला होता. हा फोटो शेअर करताना सुष्मिताने लिहिले की, ‘अनाथाश्रमात भेटलेल्या या चिमुकल्या मुलीने मला आयुष्यातील सर्वात निरागस पण सखोल धडे शिकवले, जे मी आजही जगत आहे. या क्षणाला आज ३० वर्षे पूर्ण झाली असून भारताचा मिस युनिव्हर्समधील हा पहिलाच विजय आहे!!’

‘थिल्लरपणा चालू केला तुम्ही देवीच्या नावाने’; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेवर का संतापले प्रेक्षक?

सुष्मिताने लिहिली लांबलचक नोट!

सुष्मिता पुढे म्हणाली, "हा प्रवास किती छान होता आणि आजही आहे....नेहमीच माझी सर्वात मोठी ओळख आणि शक्ती बनल्याबद्दल धन्यवाद भारत!! अमर्याद प्रेम आणि आपलेपणाबद्दल फिलिपिन्सचे आभार... तीन दशके आणि ही मोजणी अशीच अखंड सुरू राहील!! #mahalkita. मी माझ्या सुंदर @carogomezfilm #teamo सोबत आठवणी साजरा करते."

सुष्मिताने चाहत्यांचे, कुटुंबियांचे आणि मित्रांचे आभार मानले असून सुष्मिताने म्हटले आहे की, 'जगभरातील माझे सर्व प्रिय चाहते, मित्र, कुटुंबीय आणि हितचिंतकांचे आभार. तुमच्यापैकी प्रत्येकाने माझ्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे आणि मला अशा प्रकारे प्रेरित केले आहे जे कदाचित आपल्याला कधीच माहित नसेल!! मला या प्रेमाची नेहमी अनुभूती येते!! धन्यवाद!!! काय हा सन्मान आहे!! #30 #Happy30years #yourstruly #MissUniverse1994 #INDIA आय लव्ह यू मित्रांनो!! #duggadugga."

सुष्मिताच्या उत्तराने जिंकलं साऱ्यांचं मन!

१९९४च्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत सुष्मिता सेन हिने किताब पटकावला होता. यांनतर युक्ता मुखर्जी, लारा दत्ता आणि अलीकडेच हरनाज संधू यांनी हे विजेतेपद पटकावले होते. १९९४च्या इव्हेंटदरम्यान फायनल राऊंडमध्ये सुष्मिताला विचारण्यात आलं होतं की, ‘तुमच्यासाठी स्त्री असण्याचं सार काय आहे?’ त्यावर ती म्हणाली, ‘केवळ स्त्री असणे ही देवाची देणगी आहे, ज्याचे आपण सर्वांनी कौतुक केले पाहिजे. स्त्री आई असते, काळजी घेणे, सर्वांना सामावून घेणे आणि प्रेम करणे म्हणजे काय हे ती पुरुषाला दाखवते. स्त्री असण्याचं हेच सार आहे.’

Whats_app_banner