Sushant Singh Rajput Sister Shweta: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आता चार वर्षे उलटून गेली आहेत. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून चाहते अद्याप सावरू शकलेले नाहीत. या धक्क्यातून सुशांतचे कुटुंबीय तर कदाचित कधीच सावरू शकत नाही. सुशांतची बहीण श्वेता कीर्ती हिने आता आपल्या याच वेदना एका पुस्तकाच्या रूपाने सगळ्यांसमोर मांडल्या आहेत. श्वेताने नुकतेच एक पुस्तक लिहिले आहे, ज्यात तिच्या आध्यात्मिक अनुभवांचा समावेश केला आहे. नुकत्याच रेकॉर्ड केलेल्या एका पॉडकास्टमध्ये तिने अनेक धक्कादायक गोष्टीही सांगितल्या आहे. या पॉडकास्टमध्ये श्वेताने म्हटले की, सुशांतच्या मृत्यूनंतर ती त्याला पाहू शकत नसली तरी, त्याचं बोलणं ऐकू शकते. तिला अनेकदा तिच्या भावाची उपस्थिती जाणवते.
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची बहीण श्वेता सिंह कीर्तीचे नावही चर्चेत आले होते. श्वेता आणि सुशांत एकमेकांच्या खूप जवळ होते. अंकिता लोखंडेसोबतही श्वेताचे चांगले बॉन्डिंग आहे. श्वेता सिंह कीर्ती सध्या कॅलिफोर्नियामध्ये राहते. नुकतीच ती भारतात आली होती. यावेळी श्वेताने प्रितिका रावच्या पॉडकास्टवर तिचे अनेक अनुभव शेअर केले. भाऊ जाण्याच्या दुःखातून ती कशी सावरली हे देखील सांगितले.
श्वेता या पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाली की, सुशांतच्या मृत्यूनंतर ती भारतात आली होती. भारतात आल्यानंतर तिने भावाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून, सगळे विधी पूर्ण केले. आता सुशांत शिवजींसोबत कैलासवर राहत आहे, तो तिथून सर्वांना पाहत आहे, असे श्वेता म्हणाली. श्वेता म्हणाली की, सुशांतच्या मृत्यूनंतर तिला अनेकदा त्याची उपस्थिती जाणवली आहे.
याबद्दल बोलताना श्वेता म्हणाली, ‘सुशांतच्या मृत्यूनंतर एकदा माझे इअर पॉड्स हरवले होते. तेव्हा मी सगळीकडे शोधाशोध करत होते. त्यावेळी सुशांत माझ्या कानापाशी येऊन बोलला, म्हणजे त्याचा आवाज मला लगेच जाणवला. त्यावेळी तो म्हणाला की, तुझे इअरपॉड्स पडद्यामागे आहेत. तुला ते तिथेच सापडतील. आणि मी शोधल्यावर मला ते तिथेच सापडले. त्यावेळीस मी त्याला घाबरून विचारलं की, हे भीतीदायक वाटत नाही का?’ श्वेता म्हणाली की, ‘त्यावेळी उत्तर देताना सुशांत म्हणाला की, यात घाबरण्यासारखं काही नाही. माझ्याकडे फक्त शरीर नाही. तरीही मी तुझ्याशी बोलू शकतो. तुला काळजी करण्याची गरज नाही.’ ही घटना कॅलिफोर्नियात घडल्याचे देखील तिने सांगितले.
संबंधित बातम्या