मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suruchi Adarkar: लग्नानंतर सुरुची अडारकर छोट्या पडद्यावर परतली! ‘या’ मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Suruchi Adarkar: लग्नानंतर सुरुची अडारकर छोट्या पडद्यावर परतली! ‘या’ मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 03, 2024 05:26 PM IST

Suruchi Adarkar in Marathi Serial:एका ब्रेकनंतर आता सुरुची अडारकर छोट्या पडद्यावर परतणार आहे. लवकरच ती छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.

Suruchi Adarkar
Suruchi Adarkar

Suruchi Adarkar in Marathi Serial:छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनेत्री नुकतीच लग्न बंधनात अडकली होती. आता लग्नाच्या काहीच दिवसांनंतर आता सुरुची अडारकर हिने चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. एका ब्रेकनंतर आता सुरुची अडारकर छोट्या पडद्यावर परतणार आहे. लवकरच ती छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. नुकताच तिच्या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अभिनेत्री सुरुची अडारकर झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत सुरुची आडारकर एन्ट्री घेणार असून, ती एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये सरुची अडारकर मोती रंगाच्या आउटफिटमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. तिला हा लूक अगदी टीव्ही मालिकेतल्या नागिनसारखा आहे. तिचा कमबॅक लूक पाहून आता चाहते देखील उत्सुक झाले आहेत. ‘विरोचका’ची सावली बनून सुरुची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एन्ट्री घेणार आहे.

Abhishek Bachchan Post: ऐश्वर्याशी घटस्फोटाची चर्चा; आता अभिषेक बच्चनच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष!

अद्वैतला रूपालीचं सत्य कळलं आहे.नेत्रा आणि इंद्राणीने जंगलात सर्पलिपीच्या अर्थाविषयी लपवून ठेवलेलं रहस्य रूपालीला नागामुळे कळतं. त्यात तिला कळतं की, ती विरोचक आहे. त्याचबरोबर कलियुगात तिचा सेवक अव्दैतच्या रूपात वावरत आहे.रूपालीला विरोचकाचं सत्य कळल्याने नेत्रा-इंद्राणी आणि शेखरला आश्चर्य वाटलं. आता काहीही करून अव्दैतला जपायला हवं, त्याचबरोबर रूपालीचं खरं रूप उघड होण्यासाठी योजना आखायला हवी,असं तिघांनी ठरवलं होतं.

मात्र, आता त्यांच्या अडचणी आणखी वाढवण्यासाठी विरोचाकाची सावली या मालिकेत येणार आहे. नेत्रा आता या नव्या संकटाशी कसा सामना करणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

WhatsApp channel