मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suruchi Adarkar Wedding: सप्तपदी ते मंगलअष्टका; पियुष आणि सुरुचीच्या लग्नातील व्हिडीओ पाहिलात का?

Suruchi Adarkar Wedding: सप्तपदी ते मंगलअष्टका; पियुष आणि सुरुचीच्या लग्नातील व्हिडीओ पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 10, 2023 08:49 AM IST

Piyush Ranade Suruchi Adarkar Wedding: सुरुचीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर करताच सर्वजण चकीत झाले. आता त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Piyush Ranade Suruchi Adarkar Wedding
Piyush Ranade Suruchi Adarkar Wedding

Piyush Ranade Suruchi Adarkar Wedding: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. अभिनेता पियुष रानडे याच्यासोबत तिने सात फेरे घेतले आहेत. सुरुचीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. तिने हे लग्नाचे सुंदर फोटो शेअर केल्यानंतर आता चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. आता सुरुचीने त्यांच्या लग्नातील काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली सुरुचीने बुधवारी ६ डिसेंबर रोजी गुपचूप लग्नबंधनात अडकली. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. आता तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सर्वांचे आभार मानताना दिसत आहे.
वाचा: आठ दिवसात 'अ‍ॅनिमल'चा बॉक्स ऑफिसवर दणका, कमावले इतके कोटी

सुरुचीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पिवळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. त्यावर तिने छान अशी ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये सुरुची खूप सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे पियुषने अफव्हाइट रंगाचा कुर्ता घातला आहे. त्यावर पिवळ्या रंगाची ओढणी घेतली आहे. या लूकमध्ये तो देखील हँडसम दिसत आहे. व्हिडीओमध्ये सुरुची ही पियुषच्या हातात कंकण बांधत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर ते दोघेही सप्तपदी घेताना दिसत आहेत. पियुष हा सुरुचीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतानाही यात पाहायला मिळत आहे. यावेळी ते दोघेही फार आनंदात असल्याचे दिसत आहे. त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

छोट्या पडद्यावरच्या 'का रे दुरावा' या मालिकेतून अभिनेत्री सुरुची अडारकर घराघरांत लोकप्रिय झाली होती. या मालिकेत तिने साकारलेली अदितीची भूमिका सगळ्यांनाच पसंत पडली होती. सुरुची अडारकर नाटक आणि चित्रपटात देखील झळकली आहे. तिचे हे पहिले लग्न आहे. तर पियुषने यापूर्वी दोन लग्न केली आहेत. तो अभिनेत्री शाल्मली टोळ्ये आणि मयुरी वाघ यांच्याशी लग्नबंधनात अडकला होता. मात्र, लग्नाच्या काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

WhatsApp channel