Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. या शोमधील स्पर्धक निक्की तांबोळी ही पहिल्या दिवसापासूनच घरातील प्रत्येक सदस्याशी वाद घालताना दिसत आहे. ती घरातील टास्कसाठी इतर स्पर्धकांशी देखील भांडताना दिसत आहे. पण निक्कीचे वागणे, बोलणे, खेळणे घरातील सर्वच सदस्यांना खटकत आहे. तसेच बिग बॉस पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील तिची प्रचंड चिड येते. आता एका अभिनेत्रीने निक्कीवर संताप व्यक्त केला आहे.
वर्षा उसगावकर या बिग बॉसच्या घरातील कॅप्टन झाल्या आहेत. त्यांनी निक्कीला वॉशरुम साफ करण्याची जबाबदारी दिली आहे. सूरज नॉमिनेशनमध्ये निक्कीला नॉमिनेट करतो. ते पाहून निक्की चिडते. वर्षा उसगांवकर नॉमिनेशन आणि काम न करणं या दोन गोष्टींचा उगाच संबंध जोडू नकोस असं निक्कीला सांगतात. पण ऐकेल ती निक्की कसली. हा सगळा ड्रामा पाहून घरात मी बनवलेले जेवण निक्कीला द्यायचे नाही. तिला हवे तर करून खाईल नाहीतर अरबाज देईल. असे जान्हवी सगळ्या घरासमोर निक्कीला सांगते आणि इथूनच दोघींमधले वाद नवीन टोक गाठतात. आता हे सर्व पाहून अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी पोस्ट केली आहे.
सुरेखा कुडची यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला कालचा एपिसोड पाहून मत मांडले आहे. “ही निक्की कालच्या एपिसोडपासून डोक्यात गेलीच होती आज तर कहरच केला. गेममध्ये किती फालतुगिरी करते… चौकटीच्या बाहेर जायचं नव्हतं तरी गेली आणि गेम थांबवावा लागला. बरं दुसरं कोणी सांगायला जातं तर ऐकून पण घ्यायचं नाही. स्वत:चंच खरं करायचं. बघावं तेव्हा त्या अरबाजच्या अंगावर पाय टाकून बसलेली असते. असो आपण कितीही बोंबललो तरी ‘बिग बॉस’ निक्कीला ना शिक्षा करणार, ना बाहेर काढणार…कंटेंट देतेय ना… शी शी लाज काढलीये या बाईईईने” असे त्यांनी म्हटले आहे.
वाचा: 'मी तुझ्या इतका बावळट नाही', घनःश्यामने जान्हवीची अक्कल काढताच नेटकरी खूश
जवळपास सर्वच प्रेक्षकांना निक्कीचे वागणे खटकत आहे. काल तर निक्कीने हद्दच पार केली. तिने घरातील काम करण्यास नकार दिल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी कमेंट करत निक्कीला या आठवड्यात जेलमध्ये टाका असे स्पष्ट म्हटले आहे.