Suraj Chavan Life facts : ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोच्या सीझन ५ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, अजूनही प्रेक्षकांमध्ये या शोची चर्चा पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण याने या सीझनची ट्रॉफी जिंकली. सर्वसामान्य प्रेक्षकांना आपलासा वाटणाऱ्या सूरज चव्हाण याने सगळ्यांचीच मने जिंकून घेतली आहेत. त्याच्या जिंकण्याने प्रत्येकालाच खूप आनंद झाला. तर, या खेळात आणि बिग बॉसच्या घरात देखील सगळ्यांनी त्याची खूप मदत केली. विशेष म्हणजे एका गाव खेड्यातून इथवर पोहोचलेल्या सूरज चव्हाण याला लिहिता आणि वाचता येत नाही. अशावेळी तो लोकांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवतो आणि फोन कसा वापरतो, हे माहितीय का? चला जाणून घेऊया...
‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर अनेकांनी सूरजला पाठींबा दिला. मात्र, अशीही काही लोकं होती, ज्यांनी सूरजवर खूप टीका केली. केवळ सहानुभूती पोटी आणि गरिबीमुळे सूरजला ट्रॉफी दिली गेली, असं देखील म्हटलं गेलं. परंतु, असं काहीही नसल्याचं वाहिनीने देखील स्पष्ट केलं. सूरज चव्हाणची या सीझनसाठी कशी निवड झाली हे सांगताना केदार शिंदे यांनी देखील सूरजच्या सच्चेपणावर विश्वास ठेवल्याचं म्हटलं होतं. तर, सूरज चव्हाणने ट्रॉफी जिंकल्यावर या शोचा कास्टिंग डायरेक्टरने देखील सूरजसाठी पोस्ट लिहित त्याचं खूप कौतुक केलं होतं. इतकंच नाही तर, सूरज लोकांचे नंबर कसे लक्षात ठेवतो आणि फोन कसा वापरतो, हे देखील सांगितले होते.
सूरज चव्हाणच्या आयुष्यात आजवर अनेक चढ उतार आले आहेत. पण, त्याने आई मारी माता, श्री खंडोबा, गणपती बाप्पावर विश्वास ठेवला आणि तो प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरा गेला. त्याची अनेक उदाहरणं आहेत. पण, सोपं उदाहरण द्याचं तर, त्याला लिहिता येत नाही. अक्षरांचा आणि अंकांचा गोंधळ आहे. हे त्याने बऱ्याचदा सगळ्यांसमोर याची कबुली दिली आहे. मग तो फ़ोन कसा वापरत असेल? एखाद्याचा नंबर कसा लक्षात ठेवत असेल? लोक प्रॉब्लम समोर येताच रडत बसतात. पण, त्याने शक्कल लढवली.
यासाठी त्याने इमोजीसचा आधार घेतला आणि लोकांना लक्षात ठेवलं. ज्याच्यावर तो नाराज आहे किंवा जो व्यक्ती त्याच्या फारसा जवळचा नाही, त्याच्यासाठी तो ‘बुक्की’चा इमोजी वापरतो. जे लोक त्याच्यासाठी फार जवळचे आहेत, त्यांच्यासाठी एक हार्ट इमोजी तो वापरतो. मित्रांसाठी ‘मिठी’ मारण्याचा इमोजी, जरा जास्तच प्रेम असणाऱ्यांना तीन-चार हार्ट इमोजी तो वापरतो.
संबंधित बातम्या