मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sur Nava Dhyas Nava Winner : गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता

Sur Nava Dhyas Nava Winner : गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 01, 2024 08:04 AM IST

Sur Nava Dhyas Nava Winner : 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' या लोकप्रिय कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला असून गोपाळ गावंडे (Gopal Gawande) या पर्वाचा विजेता ठरला आहे.

Sur Nava Dhyas Nava Winner
Sur Nava Dhyas Nava Winner

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ हा कार्यक्रम सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे ६वे पर्व गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार? याबाबात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती.

नुकताच या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा दिमाखात पार पडला. ‘आवाज तरुणाईचा’ या पर्वात अकोल्याचा गोपाळ गावंडे विजेता ठरला. कार्यक्रमाच्या उल्लेखनीय प्रवासात, गोपाळने उत्कृष्ट सादरीकरण व अपवादात्मक कामगिरी पाहायला मिळाली. स्पर्धेतील त्याच्या उल्लेखनीय प्रवासामुळे तो या पर्वाचा ‘महागायक’ ठरला.
वाचा: यंदा गुजरातमध्ये पार पडणार फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४

‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या पर्वात जुनी गाणी नव्या अंदाजात ऐकायला मिळाली. या नव्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. गोपाळ गावंडे याचा अतुलनीय आत्मविश्वास आणि संपूर्ण पर्वातील अपवादात्मक कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्याला राजगायकाचा मान मिळाला.

‘सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा’ हे पर्व संगीतातील वैविध्य आणि प्रतिभेची समृद्धता साजरी करणारे व्यासपीठ आहे. गोपाळ गावंडेचा विजय त्याचे समर्पण, उल्लेखनीय कामगिरी आणि प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्याचा पुरावा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांना भुरळ घातली, त्यामुळे खरोखरच हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

WhatsApp channel

विभाग