मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'सूर नवा, ध्यास नवा'मध्ये सहभागी व्हायची संधी, पाहा कधी आहे तुमच्या शहरात ऑडिशन?
सूर नवा ध्यास नवा
सूर नवा ध्यास नवा (HT)
21 May 2022, 6:55 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
21 May 2022, 6:55 AM IST
  • कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई या शहरांमध्ये कधी होणार ऑडिशन्स जाणून घ्या

कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई या शहरांमध्ये २९ मेपासून रंगणार ऑडिशन्सची फेरी रंगणार आहे. या करीता वयोगट असणार आहे १५ ते ३५. तुम्ही लवकरात लवकर रियाझ करायला सुरुवात करा कारण तुमचे सुरेल गाणं ऐकायला सगळेच आतुर आहेत. या ऑडिशनमधून निवडल्या जाणाऱ्या निवडक स्पर्धकांसोबत रंगणार आहे सुरांचं हे अद्वितीय पर्व.

ट्रेंडिंग न्यूज

या अनोख्या पर्वात सुरवीरांना मार्गदर्शन करतील कार्यक्रमाचे दोन लाडके परीक्षक अर्थात सुप्रसिध्द गायक, संगीतकार नि अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय गायकीची परंपरा लाभलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे. संगीतक्षेत्रातले हे दोन मान्यवर कलावंत ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या या पर्वातून शोध घेतील, महाराष्ट्राच्या नव्या सुरांचा.... महाराष्ट्राच्या नव्या सुरविराचा!! या सुरेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे सर्वांची लाडकी गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी. तर सज्ज व्हा, सुरांच्या या नव्या कोऱ्या सुमधूर मैफलीसाठी... “सूर नवा ध्यास नवा- पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे”!!!

शहरांतील स्थळ आणि तारीख

-२९ मे रविवार (पुणे)

पी. जोग हायस्कूल, ५७, छत्रपती राजाराम महाराज पथ, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे

-३१ मे मंगळवार (औरंगाबाद)

देवगिरी महाविद्यालय, न्यू उस्मानपुरा, औरंगाबाद

-३ जून शुक्रवार (कोल्हापूर)

गायन समाज देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर

-५ जून रविवार (मुंबई) - साने गुरुजी विद्यालय ,

भिकोबा पाठारे मार्ग, कॅटरिंग कॉलेज जवळ, दादर (पश्चिम), मुंबई

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग