बॉलिवूडमधील काही कलाकार हे त्यांच्या साधेपणासाठी विशेष ओळखले जातात. त्यात कधीकधी काही कलाकार हे स्टारडम विसरुन सर्वसामान्यांप्रमाणे वागताना दिसतात. अनेकदा त्यांच्या लग्झरी गाड्या सोडून सार्वजिनक प्रवास वाहने वापरतात. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील एका सुपरस्टारचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो मुंबई मेट्रोने इतर नागरिकांप्रमाणे प्रवास करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार मुंबई मेट्रोने प्रवास करताना दिसत आहे. या प्रवासात त्याला कोणी ओळखू नये म्हणून त्याने तोंडाला मास्क लावले आहे, डोक्यावर टोपी घातली आहे. आजूबाजूला उभे असलेले लोकही अक्षयला ओळखू शकलेले नाहीत. त्याचा हा मेट्रोन प्रवास करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘अन्नपूर्णी’ची कथा काय आहे?
अक्षय कुमार ‘हा’ बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक आहे. आत्तापर्यंत अक्षयने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाच्या जोरावर अक्षयने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. चित्रपटाबरोबर अक्षय कुमार त्याच्या साधेपणामुळेही ओळखला जातो. दरम्यान मेट्रो प्रवासादरम्यानचा अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केली आहे.
अक्षयच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘ओ माय गॉड २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तसेच चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले. आता तो लवकरच 'सिंघम अगेन' हा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ‘बडे मिया छोटे मिया’, ‘वेलकम ३’ हे देखील त्याचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.