मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  थिएटरमध्ये आपटले पण ओटीटीवर येताच चमकले बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट! तुम्ही पाहिलेत का?

थिएटरमध्ये आपटले पण ओटीटीवर येताच चमकले बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट! तुम्ही पाहिलेत का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 15, 2024 05:00 PM IST

प्रत्येक चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर देखील रिलीज केला जातो. ओटीटीवर रिलीज झालेले चित्रपट प्रेक्षक घरात बसून सहज पाहू शकतात. असे अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले, परंतु ओटीटीवर प्रेक्षकांना खूप आवडले.

थिएटरमध्ये आपटले पण ओटीटीवर येताच चमकले बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट!
थिएटरमध्ये आपटले पण ओटीटीवर येताच चमकले बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट!

बॉलिवूडमध्ये अनेक जॉनरचे चित्रपट बनत असतात. प्रेक्षकांनाही वेगवेगळे चित्रपट आवडतात. दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. यातील काही सुपरहिट होतात, तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात. सद्य घडीला आपण पाहिलं तर, प्रत्येक चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर देखील रिलीज केला जातो. ओटीटीवर रिलीज झालेले चित्रपट प्रेक्षक घरात बसून सहज पाहू शकतात. असे अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले, परंतु ओटीटीवर प्रेक्षकांना खूप आवडले. आपण अशाच चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी थिएटरमध्ये फारशी कमाई केली नाही, परंतु ते ओटीटीवर प्रदर्शित होताच, त्या चित्रपटांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.

ट्रेंडिंग न्यूज

लापता लेडीज

आमिर खानच्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या आणि किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बॉक्स ऑफिसवर ‘लापता लेडीज’ची कमाई खूपच कमी होती. हा चित्रपट गेल्या महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. इतकंच नाही तर, हा चित्रपट रिलीज होताच जगभरात ट्रेंड करू लागला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

डंकी

या यादीतील पुढील चित्रपट आहे ‘डंकी’. शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ आणि ‘जवान’ इतका व्यवसाय केला नव्हता. २०२३मध्ये रिलीज झालेले ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. पण, शाहरुखचा तिसरा चित्रपट 'डंकी' चित्रपटगृहात तितकीशी कामगिरी करू शकला नाही. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला, ज्याला काही दिवसांतच प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. नेटफ्लिक्सवर 'डंकी' १०० तासांहून अधिक काळ पाहिला गेला.

अभिरामच्या हळदीत लीलाला नाचावंच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये पुन्हा होणारा नवा गोंधळ

फायटर

या चित्रपटांच्या यादीत हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’ चित्रपटाचाही समावेश आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये सुपरहिट होण्याची अपेक्षा होती. परंतु, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करू शकला नाही. मात्र, ओटीटीवर येताच या चित्रपटाने खळबळ उडवून दिली. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर'ने 'डंकी' आणि 'ॲनिमल'ला मागे टाकत १० दिवसांत नेटफ्लिक्सवर विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळवली.

मधुभाऊंची केस सुटणार! सायली आणि अर्जुन एकमेकांपासून दुरावणार? ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

धक धक

फातिमा सना शेख, रत्ना पाठक शाह आणि दिया मिर्झाचा 'धक धक' या चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाल्यानंतर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.

सुखी

या यादीत शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’ या चित्रपटानेही आपले स्थान निर्माण केले आहे. ‘सुखी’ची जादू थिएटरमध्ये चालली नाही, परंतु प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीवर बघायला खूप आवडला. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या शिल्पा शेट्टीच्या 'सुखी' चित्रपटाला ओटीटीवर प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

IPL_Entry_Point

विभाग