Viral Video: सनी लिओनीला मराठी गाण्याची भूरळ, 'नवरोबा'वर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: सनी लिओनीला मराठी गाण्याची भूरळ, 'नवरोबा'वर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video: सनी लिओनीला मराठी गाण्याची भूरळ, 'नवरोबा'वर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 06, 2024 03:39 PM IST

Sunny leone Viral Video: सध्या सोशल मीडियावर सनीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

sunny leone
sunny leone

Sunny leone Dance Video: ‘हॉट अँड ब्युटीफुल’ अभिनेत्री सनी लिओनीच्या सौंदर्य आणि बोल्डनेसचे चाहते दिवाने आहेत. दररोज ती तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी अपलोड करून वाहावा मिळवताना दिसते. सध्या सोशल मीडियावर सनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सीन मराठमोळ्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

'कन्नी' या चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावले आहे. प्रत्येक गाण्याचा जॉनर वेगळा असून सगळ्याच गाण्यांवर संगीतप्रेमी प्रेम करत आहेत. यातील विशेष गाजलेले गाणे म्हणजे 'नवरोबा' या गाण्यावरील अनेक रील्स सध्या व्हायरल होत आहेत. यातील हूकस्टेपही प्रचंड गाजत आहे आणि याचीच भुरळ बॉलिवूडच्या सनी लिओनीला पडली आहे. 'नवरोबा' गाण्यावरील सनीचे हे नृत्य सोशल मीडियावर प्रचंड गाजतेय. सनी हे गाणे एन्जॉय करतेय,असे एकंदर तिच्या चेहऱ्यावरून दिसतेय.
वाचा: अंबानींच्या कार्यक्रमाला कंगना गैरहजर, काय आहे कारण?

व्हिडीओमध्ये सनीने प्रिंटेड मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातला आहे. तसेच सनीच्या डोक्यावर टोपी दिसत आहे. मोकळे केस, हातात ब्रेसलेट या लूकमध्ये सनी अतिशय सुंदर आणि क्यूट दिसत आहे.

दरम्यान, समीर जोशी लिखित, दिग्दर्शित ‘कन्नी’ चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ऋता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी यांनी केली आहे.
वाचा: 'कोणतं सरकार आणायचं हे ठरवा', नाना पाटेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन

सनी लिओनीविषयी

सनी लिओनीचे खरे नाव करनजीत कौर असे आहे. अमेरिकेची रहिवासी असलेली सनी २०१० साली पॉनस्टार म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचे आयटम साँग प्रचंड गाजले होते. त्यानंतर तिने काही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केले. तिचा जिस्म २ हा चित्रपट तुफान हिट ठरला. तसेच राघिनी एमएमएसमध्ये देखील ती दिसली. या दोन्ही चित्रपटांनी सनीला ओळख मिळवून दिली.

Whats_app_banner