Sunny Deol: सनी देओल दारू पिऊन रस्त्यावर झिंगत होता? अखेर 'त्या' व्हायरल व्हिडीओवर अभिनेत्याची प्रतिक्रिया...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sunny Deol: सनी देओल दारू पिऊन रस्त्यावर झिंगत होता? अखेर 'त्या' व्हायरल व्हिडीओवर अभिनेत्याची प्रतिक्रिया...

Sunny Deol: सनी देओल दारू पिऊन रस्त्यावर झिंगत होता? अखेर 'त्या' व्हायरल व्हिडीओवर अभिनेत्याची प्रतिक्रिया...

Dec 07, 2023 08:49 AM IST

Sunny Deol Viral Video: एकीकडे देओल कुटुंब यशाचा आनंद साजरा करत असताना, आता सनी देओल याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Sunny Deol Viral Video
Sunny Deol Viral Video

Sunny Deol Viral Video: बॉलिवूड विश्वात सध्या देओल कुटुंब चांगलाच कल्ला करत आहे. अभिनेता सनी देओलचा 'गदर २', धर्मेंद्र यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि बॉबी देओल याचा 'अ‍ॅनिमल' हे चित्रपट तुफान गाजले आहेत. एकीकडे देओल कुटुंब यशाचा आनंद साजरा करत असताना, आता सनी देओल याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओल रस्त्याच्या मधोमध चालताना दिसत आहे. त्याला स्वतःचा तोल देखील सावरत नसल्याने तो अचानक रिक्षेसमोर येतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याला दारू पिण्यावरून सुनावलं आहे. यावर आता स्वतः सनी देओल याची प्रतिक्रिया आली आहे.

अभिनेता सनी देओल याचा हा व्हिडीओ एका फॅन पेजवरून समोर आला आहे. यामध्ये ऑफ व्हाईट रंगाचा शर्ट घातलेला सनी देओल मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसला आहे. सनी देओलला पाहताच एक ऑटोचालक त्याच्याजवळ येतो आणि त्याचा हात धरून त्याला रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करतो. सनी देओलचा हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली होती. अभिनेता दारू पिऊन रस्त्यावर चालत असल्याचे सगळ्यांना वाटत होते. मात्र, असे काहीही नसल्याचे सनी देओल याने स्पष्ट केले आहे.

TMKOC: 'दयाबेन' नाही तर मालिकेत 'या' व्यक्तीला परत आणून मेकर्सनी दिलं सरप्राईज!

सनी देओलचा हा व्हिडीओ त्याच्या आगामी 'सफर' चित्रपटाच्या शूटिंगचा आहे. 'सफर' हा चित्रपट सनी देओल याने 'गदर २'च्या आधीच साईन केला होता. आता खुद्द सनी देओलने एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या एक सीन दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याची बरीच चर्चा निर्माण झाली आहे. मात्र, सानी देओलने स्वतः यावर खुलासा केल्यानंतर सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे.

सनी देओल सध्या 'गदर २' या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या चित्रपटाने सनी देओल याला धमाकेदार कमबॅक करून दिले आहे. 'गदर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलाच कल्ला केला होता. आता लवकरच सनी देओल 'सफर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Whats_app_banner