सनी देओलने नकार दिल्याने शाहरुख खानला मिळाली भूमिका, १९९७ चा 'हा' चित्रपट ठरला होता फ्लॉप
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सनी देओलने नकार दिल्याने शाहरुख खानला मिळाली भूमिका, १९९७ चा 'हा' चित्रपट ठरला होता फ्लॉप

सनी देओलने नकार दिल्याने शाहरुख खानला मिळाली भूमिका, १९९७ चा 'हा' चित्रपट ठरला होता फ्लॉप

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 16, 2024 01:55 PM IST

१९९७ साली शाहरुख खानचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खानसोबत माधुरी दीक्षित दिसली होती. मात्र १९९७ च्या फ्लॉप चित्रपटांमध्ये या चित्रपटाचे नाव घेतले जाते. तुम्ही चित्रपटाचे नाव ओळखले का?

1997 flop film
1997 flop film

शाहरुख खान बॉलिवूडचा किंग खान आहे. प्रेक्षक त्याच्या नावाने चित्रपट पाहण्यासाठी पोहोचतात. पण आज आम्ही तुम्हाला शाहरुख खानच्या फ्लॉप झालेल्या चित्रपटाबद्दल सांगत आहोत. हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खानसोबत माधुरी दीक्षित दिसली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी देओलला पहिल्यांदा या चित्रपटात शाहरुख खानची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र सनी देओलने ही भूमिका साकारण्यास नकार दिला.

सनी देओलने नाकारला सिनेमा

शाहरुख खानने या चित्रपटात एका मूकबधिर व्यक्तीची भूमिका साकारली होती. तुम्ही चित्रपटाचे नाव ओळखले का? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. कोयला असं या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटात शाहरुख खान एका मूकबधिर व्यक्तीची भूमिका साकारत आहे. अमरीश पुरी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता सनी देओल ही पहिली पसंती होती. मात्र सनी देओलने ही भूमिका साकारण्यास नकार दिल्यानंतर शाहरुख खानला ही भूमिका ऑफर करण्यात आली.

शाहरुखने साकारली भूमिका

शाहरुख खानने कोयला या चित्रपटात एका मूकबधिर व्यक्तीची भूमिका साकारली असल्याने त्याच्याकडे चित्रपटात कोणतेही संवाद नाहीत. या चित्रपटात शाहरुखच्या संवादाअभावी हा चित्रपट फ्लॉप झाल्याचे मानले जात आहे. या चित्रपटात शाहरुख खानच्या व्यक्तिरेखेचे नाव शंकर आहे.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाता येणार सिनेमा

७ एप्रिल १९९७ रोजी कोयला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी केले होते. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट १२ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 28 कोटींची कमाई केली होती. चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ६.२ आहे. त्याचबरोबर हा चित्रपट तुम्ही जी 5 वर मोफत पाहू शकता.
वाचा: फाटलेले कपडे घालून कंटाळलो होतो; विक्रांत मेसीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

शाहरुखच्या खानच्या कामाविषयी

शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटावर काम करत आहे. शाहरुखचा किंग हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. सुहाना खान आणि अभिषेक बच्चन देखील या चित्रपटात दिसणार आहेत. सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात. एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून मिळणार असल्याचे समोर आले आहे.

Whats_app_banner