'प्रतिघट', 'राजलक्ष्मी' आणि 'यतीम' या हिट सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणजे सुजाता मेहता. त्या त्यांच्या चित्रपटांसोबतच कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. नुकताच सुजाता यांनी सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या फेमस अफेअरबद्दल सांगितले आहे. सुजाताने १९९३मध्ये सनी आणि डिंपलसोबत 'गुनाह' या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यावेळी अभिनेत्रीने या दोघांची केमिस्ट्री आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. आता त्यांनी सनी आणि डिंपलच्या नात्यावर जी प्रतिक्रिया दिली ती ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत.
सुजाता यांनी सिद्धार्थ कन्नला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी डिंपल आणि सनी देओल यांच्या नात्यावर भाष्य केले. "मी त्यांच्यासोबत गुनाह या चित्रपटात काम केले होते. त्यांची केमिस्ट्री खूप चांगली होती आणि दोघेही माझ्या खूप जवळ होते. आता आम्ही सगळे एकत्र काम करत असल्याने लपवण्यासारखं काहीच नव्हतं. आमच्या प्रोफेशनमध्ये मला वाटतं की प्रत्येकजण प्रोफेशनल आहे. प्रत्येकजण आपलं काम करतो, निघून जातो. जेव्हा जेव्हा आम्ही 'गुनाह'च्या सेटवर चित्रीकरणासाठी गेलो तेव्हा त्यांची केमिस्ट्री पडद्यावर आणि पडद्याबाहेर उत्तम होती. त्यांच्या नशिबात एकत्र राहणे ठरले होते" असे सुजाता या म्हणाल्या.
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडीया यांचा चित्रपट
याच मुलाखतीत सुजाताने राजेश खन्ना यांच्या जय जय शिव शंकर या चित्रपटात तिला कास्ट करण्यात आल्याचंही सांगितलं होतं. तिला मुख्य भूमिका देण्यात आली होती, पण नंतर तिची जागा डिंपल कपाडियाने घेतली. यामागचं कारण म्हणजे त्यांच्या मुलांना आपल्या आई-वडिलांना पुन्हा एकत्र येताना पाहायचे होते. राजेश खन्ना आणि डिंपल वेगळे झाले होते. त्यानंतर त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. सुजाता यांनी सांगितले की, जेव्हा ती राजेश खन्नाला विमानतळावर भेटली तेव्हा तिला समजले की राजेश खन्ना डिप्रेशनमध्ये आहे. मात्र, हा चित्रपट कधीच पूर्ण झाला नाही किंवा प्रदर्शित ही झाला नाही.
वाचा: म्हणून मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणं बंद केलं; अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं!
सुजाता यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी अगदी लहान पणापासूनच आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९८६ साली आलेल्या प्रतिघाट या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांचे विशेष कौतुक झाले. या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. याशिवाय सुजाताने गुनाह, यतीम यांसारख्या चित्रपटांमध्येही सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या पुरुषार्थ या मल्याळम चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सुजाता २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सेक्शन ३७० या चित्रपटात दिसली होती.