Sunny Deol: अमृता सिंहच्या आईने दिला होता सनीसोबतच्या नात्याला नकार, जाणून घ्या पुढे काय झाले
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sunny Deol: अमृता सिंहच्या आईने दिला होता सनीसोबतच्या नात्याला नकार, जाणून घ्या पुढे काय झाले

Sunny Deol: अमृता सिंहच्या आईने दिला होता सनीसोबतच्या नात्याला नकार, जाणून घ्या पुढे काय झाले

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 19, 2023 12:03 AM IST

Sunny Deol Birthday: आज १९ ऑक्टोबर रोजी अभिनेता सनी देओलचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या खासगी आयुष्याविषयी…

Sunny Deol
Sunny Deol

बॉलिवूडमधील 'गदर' अभिनेता म्हणून सनी देओल ओळखला जातो. त्याचा 'गदर' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'गदर २' या सीक्वेलने देखील तुफान कमाई केली. आज १९ ऑक्टोबर रोजी सनीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या खासगी आयुष्याविषयी...

९०च्या दशकात सनी देओल हा अतिशय लोकप्रिय अभिनेता होता त्याचे नवा अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. मात्र अभिनेत्री अमृता सिंग आणि डिंपल कपाडिया यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चा जास्तच रंगल्या होत्या. पण जेव्हा अमृताच्या आईला सनी देओल विषयी कळाले तेव्हा त्यांनी या नात्याला नकार दिला होता.
वाचा: अवघ्या ६व्या वर्षी झाले बेघर, कधीकाळी भांडीही धुतली! ओम पुरी यांच्याबद्दल वाचाच...

सनीने काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला 'अनेक अभिनेत्रींसोबत तुझे नाव जोडले गेले होते. तेव्हा कसे वाटले' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने “अशा गोष्टी होत असतात. हा खेळाचाच एक भाग आहे” असे म्हटले. जेव्हा अफेअरच्या चर्चा सनी देओलची पत्नी पूजापर्यंत पोहोचतात तेव्हा तिची प्रतिक्रिया कशी असते? असा प्रश्न पुढे विचारण्यात आला होता. त्यावर सनीने “तिच्यापर्यंत या सर्व चर्चा पोहोचतात की नाही हे मला माहीत नाही. पण अशा काही गोष्टीच नाहीत.”

इंडस्ट्रीत अभिनेत्री अमृता सिंगसोबत तुझ्या अफेअरच्या चर्चा होत्या. या चर्चा ऐकून राग येतो का? असा प्रश्न पुढे विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “फिल्म इंडस्ट्रीत येण्याआधी लोक सेलिब्रिटींबद्दल काय लिहितात, हे सर्व मी पाहिले आहे. हे सर्व सहन करावेच लागते. कधी कधी उगाच वाढवून काहीही लिहिले जाते, तेव्हा राग येतो. अशी व्यक्ती जर कधी भेटली तर त्याला मारावेसे वाटते. अजून काय करू शकतो?”

सनी देओल आणि अमृता सिंह लग्न करणार असे म्हटले जायचे. मात्र, अमृताच्या आईला सनी आवडत नसे. तिने या नात्याला नकार दिला होता. जेव्हा सनी पूजाशी लग्न करत आहे हे कळाले तेव्हा अमृताला धक्का बसला होता. अमृता शिवाय सनीचे नाव डिंपल कपाडियाशी जोडले गेले होते. काही दिवसांपूर्वीच सनी देओल, अमृता सिंग आणि डिंपल कपाडिया या तिघांना एकत्र पाहिले गेले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

Whats_app_banner