Sunil Pal Kidnapping Case : कॉमेडियन सुनील पाल यांच्या पत्नीने सोशल मीडियावर पती बेपत्ता असल्याचे सांगितल्याने त्यांचे चाहते काळजीत पडले होते. त्यांनी पोलिसांतही तक्रार दाखल केली होती. मात्र, काही तासांनी परतलेल्या सुनील यांनी आपले अपहरण झाल्याचे म्हटले होते. या प्रकरणानंतर आता सावरलेल्या सुनील पाल यांनी पहिल्यांदाच आपली आपबिती सांगितली आहे. सुनीलने आता खुलासा केला आहे की, तो अजूनही या आघाताने त्रस्त आहे. सुनील म्हणाला की, की, तो अनोळखी नंबरवरून कॉल उचलण्यास अजूनही घाबरत आहे. आता तो टॅक्सीऐवजी रिक्षाने प्रवास करणे पसंत करतो. अपहरणकर्त्यांसोबत घालवलेले २२ तास त्याच्यासाठी नरकासारखे होते, असे तो म्हणाला. अपहरणकर्ते अजूनही त्याच्यावर नजर ठेवून आहेत, असे सुनीलला वाटते.
'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सुनील पाल म्हणाला, ‘अपहरणकर्त्यांसोबतचे ते २२ तास माझ्यासाठी नरकासारखे होते. त्याने मला धमकी दिली की, जर माझ्या फोनमधील सर्व डेटा, ज्यात कुटुंबआणि मित्रांच्या नंबरचा समावेश आहे, ट्रान्सफर केला नाही तर तो काहीही करू शकतो. मला अजूनही टॅक्सीत बसायला भीती वाटते. त्या घटनेने मी घाबरलो आहे. मला असे वाटते की, ते अजूनही माझ्यावर लक्ष ठेवून आहेत.’
सुनील पुढे म्हणाला की, ‘पोलिसांनी खूप सहकार्य केले. मेरठमधील कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार करा, असे त्यांनी सांगितले होते. पण मी आधी मुंबईला यायचं ठरवलं. मी सुरुवातीला तक्रार करण्यास संकोच करत होतो. परंतु, नंतर माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा दिला. मी यूपी पोलिस आणि योगी सरकार यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी हे प्रकरण सोडवले.’ सुनील म्हणाला की, ते एक मोठे रॅकेट आहे, जे मुंबईतील सेलिब्रिटींना लक्ष्य करते. आधी टोकन मनी ऑफर करतात आणि नंतर अपहरण करतात. त्यांनी ३-४ सेलेब्सना टार्गेट केलं आणि त्यानंतरही त्यांच्या लिस्टमध्ये आणखी काही लोक होते.
त्यांनी मला जीवे मारण्याची सुपारी घेतल्याचे सांगितले आणि बंदूक, चाकू आणि विषाने जीवे मारण्याची धमकी दिली. कल्पना करा की, मला एका कार्यक्रमासाठी हरिद्वारला आमंत्रित केले आणि नंतर २२ तासांसाठी माझे जीवन नरक बनवून टाकले. कमकुवत हृदयाचा असतो, तर कदाचित मी मेलो असतो.
त्या लोकांच्या तावडीतून तो कसा सुटला हे सुनीलने सांगितले. "मी माझ्या बायकोला फोन केला नाही, तर मित्रांकडून पैसे गोळा केले. सुरुवातीला अपहरणकर्त्यांनी १० लाख रुपयांची मागणी केली, पण नंतर ८ लाख रुपये घेऊन निघून गेले.'
संबंधित बातम्या